उल्हासनगर महापालिकेत १५ सफाई कामगारांच्या मुले थेट लिपिक, रोजंदारीवरील २७ जणांना नोकरी
By सदानंद नाईक | Updated: September 26, 2025 17:41 IST2025-09-26T17:41:57+5:302025-09-26T17:41:57+5:30
इतर पदेही आयुक्तानी पदेही भरण्यास सुरवात केली.

उल्हासनगर महापालिकेत १५ सफाई कामगारांच्या मुले थेट लिपिक, रोजंदारीवरील २७ जणांना नोकरी
सदानंद नाईक, उल्हासनगर : सफाई कामगाराच्या १५ शिक्षित मुलांना शासनाच्या २०२३ रोजीच्या 'शासन निर्णय नुसार आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी वर्ग-३ च्या लिपिक पदावर तसेच ३६ कर्मचाऱ्याच्या मुलांना लाडपागे समितीनुसार सफाई कामगार या पदावर नियुक्ती देण्यात आली. तसेच इतर पदेही आयुक्तानी पदेही भरण्यास सुरवात केली.
उल्हासनगर महापालिकेत रिक्त पदे दिवसेदिवस वाढत असून कंत्राटी कामगारांची एकूण संख्या ७०० पेक्षा जास्त झाली. आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी अनुकंपातत्व, पदोन्नती, वारसाहक्क आदी पदे भरण्यास सुरवात केली. सफाई कामगारांच्या शिक्षित १५ मुलांना थेट लिपिक पदी तर इतर ३६ मुलांना लाडपागे समितीनुसार सफाई कामगार पदी नियुक्ती केली. सन-१९९६ पूर्वी रोजनदारीवर साफसफाईचे काम करणाऱ्या एकूण २७ कामगारांना न्यायालयाच्या आदेशान्वये महापालिका सेवेत कायम स्वरुपी समावून घेण्यात आले.
महापालिकेत कार्यरत असताना निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना अनुकंपातत्वाने नोकरी देण्यात येते. त्यानुसार कनिष्ठ अभियंता -१, लिपिक -२२, तारतंत्री -१, शिपाई -११, सफाई कामगार -६, असे एकूण ४२ जणांना अनुकंपाने महापालिकेच्या नोकरीत समावुन घेण्यात आले. तसेच विविध विभागात कार्यरत एकूण ६५ कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात येणार आहे. बारवी धरणाची उंची वाढविल्याने विस्थापीत झालेल्या कुटुंबियांना पुनर्वसन प्रकल्पांतर्गत ठाणे जिल्हातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थाना एमआयडीसी मार्फत करण्यात येणाऱ्या पाणी वाटपाच्या समन्यायीतत्ववर एकूण ३ प्रकल्पबाधीतांना महापालिकेच्या आस्थापनेवर नोकरीत समावून घेण्यात आले.
लाच घेतांना सापडलेले अधिकारी मूळ पदावर
महापालिकेचे जे अधिकारी व कर्मचारी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यवाईत रंगेहात सापडले. त्यांच्याकडील प्रभारी विभाग प्रमुखाचा कार्यभार संपुष्टांत आणून त्यांना त्याच्या मुळ पदाचे कामकाज देण्यात आले. व ज्या कर्मचाऱ्याना पदोन्नती देण्यात आलेली आहे. त्या कर्मचाऱ्याना विभाग प्रमुख म्हणून पदभार देण्यात येणार आहे.