उल्हासनगर महापालिका आयुक्ताकडून स्वच्छतेची पाहणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 18:56 IST2025-07-04T18:55:25+5:302025-07-04T18:56:41+5:30
आयुक्तांच्या अचानक पाहणी दौऱ्याने सफाई कामगार, मुकादम, स्वच्छता निरीक्षक, प्रभाग अधिकारी आदीचे धाबे दणाणले आहे.

उल्हासनगर महापालिका आयुक्ताकडून स्वच्छतेची पाहणी
उल्हासनगर : महापालिका स्वच्छतेची अचानक पाहणी आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी करून रस्त्यावर बांधकामाचे साहित्य ठेवणाऱ्यावर दंडात्मक कारवाई केली. आयुक्तानी काही घरी जाऊन स्वच्छतेबाबत महिलांचे मत घेत अस्वच्छता करणाऱ्यावर कारवाईचा इशारा दिला. प्रभाग समिती क्रं-३ मधील साफसफाईचे खाजगीकरण केले असून त्या प्रभाग समिती अंतर्गत स्वच्छतेचाही आढावा घेण्याचा सल्ला नागरिकांनी दिला.
उल्हासनगर महापालिका आयुक्त मनिषा आव्हाळे हे शहर विकासावर लक्ष जे केंद्रित न करता, नुसत्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यात व्यस्त असतात. असी टिका आयुक्तावर होत आहे. मात्र गुरुवारी आयुक्तानी अचानक छत्रपती शिवाजी महाराज चौकातून स्वच्छतेची पाहणी सुरू केली. फॉरवर्ड लाईन चौक, साईबाबा मंदिर, कॅम्प नं-३ ओटी मार्ग, रेणुका चौक, सम्राट अशोकनगर, नेहरू चौक, गोल मैदान चौक मार्गे महापालिका शाळा क्रं-२७ आदी विभागातील स्वच्छतेची पाहणी केली. पाहणीत काही ठिकाणी घाण आणि कचरा पाहून त्यांनी संबंधित सफाई कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. तसेच प्रभाग क्षेत्रातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्याबद्दल आयुक्तांनी थेट प्रभाग प्रमुखाना जबाबदार धरले. शहरातील स्वच्छतेबाबत कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही. याला जबाबदार असलेल्यांवर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट निर्देश आयुक्त आवळे यांनी दिले. कामात निष्काळजीपणासाठी थेट जबाबदारी निश्चित केली जाईल. असेही आयुक्त पाहणी दौऱ्या दरम्यान म्हणाले.
आयुक्तांच्या अचानक पाहणी दौऱ्याने सफाई कामगार, मुकादम, स्वच्छता निरीक्षक, प्रभाग अधिकारी आदीचे धाबे दणाणले आहे. महापालिकेने प्रभाग समिती क्रं-३ अंतर्गतील साफसफाईचे खाजगीकरण केला असून महापालिका वर्षाला १० कोटी पेक्षा जास्त खर्च केला जातो. असे बोलले जाते. प्रभाग समिती क्रं-३ अंतर्गत साफसफाईचे खाजगीकरण करूनही स्वच्छते बाबत पुढे नसल्याने, खाजगीकरण दूर करण्याची मागणीही राजकीय नेते व नागरिकांकडून होत आहे.