उल्हासनगरात उसन्या पैशांच्या वादातून मायलेकांना मारहाण
By सदानंद नाईक | Updated: February 6, 2023 20:03 IST2023-02-06T20:02:59+5:302023-02-06T20:03:06+5:30
याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून त्यांच्या धमकी सत्राने कुटुंब दहशती खाली आहे.

उल्हासनगरात उसन्या पैशांच्या वादातून मायलेकांना मारहाण
उल्हासनगर : भैय्यासाहेब आंबेडकरनगर परिसरात राहणाऱ्या आई व मुलाला अवघ्या ३ हजार रुपये उसने पैशातून घरात घुसून मारहाण केल्याचा प्रकार शनिवारी घडला. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गणेश कांबळे व आकाश गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून त्यांच्या धमकी सत्राने कुटुंब दहशती खाली आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-१ खेमानी परिसरातील भैय्यासाहेब आंबेडकरनगरात निकील चाबुकस्वार हा तरुण आई-वडिलांसह राहतात. निकील याने ३ उसने पैशे घेतले. या वादातून गणेश कांबळे व आकाश गायकवाड यांनी पैशाची मागणी करून शनिवारी घरात घुसून निकील चाबुकस्वार यांच्यासह त्याची आई मीना यांना चाकूने वार करून लाकडी दांडक्याने मारहाण केली. या मारहाणीत डोक्याला टाके पडून गंभीर जखमी झालेल्या दोघा मायलेकांवर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तसेच याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान आरोपींच्या धमकी सत्राने चाबुकस्वार कुटुंबानी जीविताला धोका निर्माण झाल्याची भीती व्यक्त केली. उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक फुलपगारे यांनी या मारहाण प्रकरणी यापूर्वीच गुन्हा दाखल झाल्याचे सांगितले. तसेच आरोपीच्या शोधत पोलीस पथक लागले असून अधिक तपास पोलीस करीत असल्याचे म्हणाले.