उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी यांच्या गाडीवर हल्ला; गाडीचे नुकसान, गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 20:18 IST2021-05-30T20:18:00+5:302021-05-30T20:18:34+5:30
आमदार कुमार आयलानी काही कामा निमित्त महापालिका मुख्यालय परिसरात शनिवारी रात्री आले होते.

उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी यांच्या गाडीवर हल्ला; गाडीचे नुकसान, गुन्हा दाखल
सदानंद नाईक
उल्हासनगर : आमदार कुमार आयलानी यांनी शनिवारी रात्री महापालिका स्विमिंग पूल येथे पार्किंग केलेल्या मर्सिडीज गाडीवर अज्ञात युवकाने दगड मारून पलायन केले. सदर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्या मध्ये कैद झाली असून याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
आमदार कुमार आयलानी काही कामा निमित्त महापालिका मुख्यालय परिसरात शनिवारी रात्री आले होते. महापालिका तरण तलावाच्या बाजूने आयलानी यांनी एमएच-०५, डीएच-५५५५ क्रमांकाची मर्सिडीज गाडी पार्किंग केली होती. यावेळी अज्ञात इसमाने आयलानी यांच्या गाडीवरील समोरच्या काचावर दगड मारून पलायन केले. सदर प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून याप्रकाराने खळबळ उडाली. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अज्ञात इसमाचा शोध घेत आहेत. आयलानी यांच्या गाडीवरील हल्ल्याचा शहर भाजपने निषेध केला. पोलिसांनी योग्य दिशेने चौकशी केल्यास खरा सूत्रधार मिळण्याची शक्यता व्यक्त केली.