- सदानंद नाईक, उल्हासनगर माजी आमदार पप्पू कलानी यांचे कट्टर समर्थक व ओमी टीमचे प्रवक्ता कमलेश निकम यांची पत्नी अश्विनी निकम याचा महापौर पदासाठी एकमेव अर्ज आल्याने त्याची महापौर पदाची घोषणा बाकी आहे. कलानी म्हणजे निकम असे समीकरण असल्याने कलानी महलच सत्ताकेंद्र राहणार आहे.
उल्हासनगर महापालिका महापौरपद ओबीसीसाठी आरक्षित होताच शिंदेसेनेकडून माजी महापौर राजश्री चौधरी, महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी, इंदिरा पाटील यांच्यासह ओमी टीमच्या अश्विनी निकम व डिंपल ठाकूर यांच्या नावाची चर्चा झाली.
शिंदेसेनेने वंचित, साई व अपक्ष नगरसेवकाच्या मदतीने सत्तेची ४० ही मॅजिक फिगर गाठली. मात्र भाजपाच्या महायुती म्हणण्याला गुरुवारी झालेल्या भाजपा व शिंदेसेनेच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाले. शिंदेसेनेचा महापौर तर उपमहापौर भाजपाचा असे ठरवण्यात आले. शिंदेसेनेतील ओमी टीम समर्थक अश्विनी निकम यांचे महापौर पदी तर उपमहापौरपद भाजपाचे पूर्वेतील नगरसेवक अमर लुंड यांचे नाव निश्चित झाले.
या दोन्ही नावावर शुक्रवारी सकाळ पर्यंत चर्चा सुरू होती. निकम ह्या कलानी समर्थक असल्याने, शहराचे सत्ता केंद्र पुन्हा कलानी महल राहणार आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सोबत दोस्तीचा गठबंधन ठेवणारे ओमी कलानी यांच्यावर शिंदेसेनेचे प्रमुख व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विश्वास ठेवून अश्विनी निकम यांच्या महापौर पदाला पाठिंबा दिला.
महापालिकेतील एकूण ७८ जागेसाठी दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवून भाजपाचे सर्वाधिक ३७, तर शिंदेसेनेचे ३६ नगरसेवक निवडून आले. सत्तेच्या बहुमत मॅजिक फिगरसाठी ४० नगरसेवकांची आवश्यकता होती.
ती मॅजिक फिगर शिंदेसेनेने वंचित, साई व अपक्ष नगरसेवकाला सोबत घेऊन पूर्ण केली. त्यांनी ४० जणांच्या गटाची नोंद कोकण भवन येथे करून अरुण अशांन यांची गटनेता पदी निवड झाली. तर ३७ नगरसेवकांचा भाजपाने गट स्थापन करून गटनेते पदी राजेश वधारिया यांची निवड केली. अश्विनी निकम यांची महापौर निवड म्हणजे कलानी यांच्याच कुटुंबाचा महापौर झाला. असे बोलले जाते. त्यामुळे कलानी महल सत्ताकेंद्र झाल्याचे बोलले जाते.
काँग्रेस एकमेव विरोधी नगरसेवक
महापालिकेत भाजप व शिंदेसेनेची युती झाल्याची कबुली दोन्ही नेत्यांनी देऊन महापौर व उपमहापौर पदासाठी चर्चा करून उमेदवार दिले. तर वंचित, साई व अपक्ष नगरसेवक सत्ते सोबत गेले. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच विरोधी बाकावर एकमेव काँग्रेसच्या अंजली साळवे ह्या दिसणार आहेत.
शिंदेसेनेत नाराजी
शिंदेसेनेच्या ३६ पैकी २३ पेक्षा जास्त नगरसेवक हे मूळ शिंदेसेनेतील आहेत. तर उर्वरित ओमी कलानी टीम गटातील आहेत. नगरसेवकाची संख्या शिंदेसेनेचे जास्त असल्याने, महापौर पदही निष्ठावंत शिंदेसेनेकडे जाणार असल्याचे बोलले जात होते. मात्र महापौर पद कलानी महलात गेल्याने निष्ठावंत शिवसैनिकांत नाराजी आहे.
आयलानी व कलानी
महापालिका सत्तेसाठी भाजपा व शिंदेसेना यांच्यात चढाओढ होती. दोन्ही पक्षाने सत्तेसाठी एकत्र आल्याने आमदार कुमार आयलानी व माजी आमदार पप्पू कलानी एकत्र येणार आहे. कलानी हे आयलानी यांची कोंडी करणार आहे.
Web Summary : Ashwini Nikam, a Kalani supporter, is set to become Ulhasnagar's mayor. With Shinde's backing, Kalani's power center returns. This alliance could bring Ailani and Kalani together, impacting city politics, despite internal Sena dissatisfaction.
Web Summary : कलानी समर्थक अश्विनी निकम उल्हासनगर की महापौर बनने के लिए तैयार हैं। शिंदे के समर्थन से, कलानी का सत्ता केंद्र वापस आ गया है। इस गठबंधन से आयलानी और कलानी एक साथ आ सकते हैं, जिससे शहर की राजनीति प्रभावित हो सकती है, आंतरिक सेना असंतोष के बावजूद।