उल्हासनगरात तरुणांची भर रस्त्यात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

By सदानंद नाईक | Updated: April 10, 2023 15:53 IST2023-04-10T15:52:25+5:302023-04-10T15:53:06+5:30

उल्हासनगर राधास्वामी चौक येथील एका झाडाला तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार रविवारी उघड झाला.

ulhasnagar many youths committed hanging themselves from a tree on the road | उल्हासनगरात तरुणांची भर रस्त्यात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

उल्हासनगरात तरुणांची भर रस्त्यात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

सदानंद नाईक, उल्हासनगर : कॅम्प नं-३, राधास्वामी सत्संग चौक येथील झाडाला तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार रविवारी घडला. मध्यवर्ती पोलिसांनी मृतदेह उत्तर तपासणीसाठी मध्यवर्ती रुग्णालयात पाठविला असून मृत तरुणाचे नाव रतन उर्फ राजेश बहादूर लालचंद बिका असल्याचे उघड झाले. 

उल्हासनगर राधास्वामी चौक येथील एका झाडाला तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार रविवारी उघड झाला. भर दिवसात व चौकात हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली. मध्यवर्ती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करीत मृतदेह उत्तर तपासणीसाठी मध्यवर्ती रुग्णालयात पाठविले. पोलिसांनी अधिक तपास केला असता आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव रतन उर्फ राजेश बहादूर लालचंद बाका असून तो भावासह कॅम्प नं-१ येथील बिर्ला मंदिर परिसरातील एका लॉज मध्ये राहतो. तरुणांची हत्या की आत्महत्या? अशी चर्चा रंगली असून मध्यवर्ती पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: ulhasnagar many youths committed hanging themselves from a tree on the road