शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात रंगणार शिवसेना विरुद्ध आव्हाड सामना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2021 18:49 IST

राज्य शासन दिवाळखोरीत निघाले नाही, शहरातील प्रश्न निकाली निघणार : शिवसेना शहरप्रमुख चौधरी

ठळक मुद्देराज्य शासन दिवाळखोरीत निघाले नाही, शहरातील प्रश्न निकाली निघणार : शिवसेना शहरप्रमुख चौधरी

सदानंद नाईक उल्हासनगर : गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे वक्तव्य शिवसेनेने खोडीत काढून राज्य शासन दिवाळखोरीत निघाले नसून शासनाने गेल्या सहा महिन्यात शहर विकासासाठी १२५ कोटींचा निधी दिला, अशी माहिती पत्रकार परिषदेत शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिली. यावेळी शिवसेनेचे नेते धनंजय बोडारे, उपशहरप्रमुख अरुण अशान यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. 

उल्हासनगरात अवैध व धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आला असून हजारो नागरिक विस्थापित होण्याची शक्यता व्यक्त होते. दरम्यान उल्हासनगर ट्रेड असोसिएशनचे अध्यक्ष सुमित चक्रवर्ती व धोकादायक इमारती मधील नागरिकांनी शहरातील समस्यांवर तोडगा काढण्यासाठी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना शुक्रवारी बोलाविले होते. यावेळी आव्हाड यांनी ईगल येथील पत्रकार परिषदेत १५ दिवसात जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त व संबंधितांची चर्चा व बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. तसेच राज्य शासनाची तिजोरी रिकामी असल्याचे सांगून कर्ज काढून कर्मचाऱ्यांचे पगार दिले जाते, असे बोलताना सांगितले.

याप्रकारने शिवसेनेत हलचल निर्माण झाली. राज्य सरकारमध्ये महत्वाचे मंत्रिपद असलेल्या जितेंद्र आव्हाड यांनी शासनाची तिजोरीत खळखळाट असल्याचे केलेले व्यक्तव्य शिवसेनेच्या जिव्हारी लागले. शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, धनंजय बोडारे, उपशहरप्रमुख अरुण अशान आदींनी प्रवीण इंटरनॅशनल हॉटेल मध्ये शनिवारी दुपारी पत्रकार परिषद घेतली. सहा महिन्यांपूर्वी शहर विकासासाठी राज्य शासनाने ७५ कोटींचा निधी दिला असून धोकादायक इमारती मधून बेघर होणाऱ्या नागरिकां साठी निवारा केंद्र व इतर सुविधेसाठी ५० कोटींचा निधी दिल्याचे चौधरी यांनी सांगितले. तसेच राष्ट्रवादी पक्षाचे गटनेता भरत गंगोत्री यांच्या मागणीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रभागातील विकास कामांसाठी २६ कोटींचा निधी दिला. शासनाची तिजोरीत खळखळाट असतीतर शासनाने विकास कामासाठी कोट्यवधींची दिला असता का? असा प्रश्न शिवसेनेने केला. एकूणच शहरातील समस्या सोडविण्यासाठी श्रेयवाद निर्माण होण्याची भीती व्यक्त होत असून आव्हाड विरुद्ध शिवसेना असा सामना रंगण्याची शक्यता व्यक्त होते. 

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाulhasnagarउल्हासनगरJitendra Awhadजितेंद्र आव्हाडMaharashtraमहाराष्ट्रShrikant Shindeश्रीकांत शिंदे