शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

CoronaVirus: स्मशानात मृतदेहाला पाणी पाजणं पडलं महागात; अंत्यविधीला गेलेल्या १९ जणांना कोरोनाचा संसर्ग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2020 17:24 IST

असे असतानाही नातेवाईकांनी मृतदेह अंत्यदर्शनासाठी ठेवून, अंत्ययात्रेत अनेक जण सहभागी झाले.

उल्हासनगर : कोरोना रुग्णाच्या अंत्यविधीला हजेरी लावणाऱ्या पैकी १९ जनाला कोरोनाचा संसर्ग झाला. तर अनेकांचे स्वॉब अहवाल येण्याचे बाकी आहे. या प्रकाराने हिराघाट परिसरात भीतीचे वातावरण असून सदर घटना गेल्या आठवड्यात घडली. असाच प्रकार गेल्या महिन्यात खन्ना कंपाऊंड परिसरात घडली होती. उल्हासनगर कॅम्प नं-३ हिराघाट परिसरात राहणारा ४५ वर्षाचा इसम एका खासगी वाहनावर चालक असल्याने त्याचे मुंबईला येणे जाणे होते. गेल्या आठवड्यात त्याला चक्कर येऊन रस्त्यावर पडल्याने एका खाजगी रुग्णालयात उपचार करण्यासाठी नेण्यात आले.मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला, त्यानंतर मध्यवर्ती रुग्णालयात नेऊन मृत्यू पश्चात रुग्णालयाने त्याचा स्वाब घेतला. तसेच मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देताना कोरोना रुग्ण प्रमाणे बांधून दिला. अंत्ययात्रेत जास्त जणांनी सहभागी होऊ नये. बांधलेला मृतदेह उघडू नये. असे रुग्णालयाने नातेवाईकांकडून लिहून घेतले. असे असतानाही नातेवाईकांनी मृतदेह अंत्यदर्शनासाठी ठेवून, अंत्ययात्रेत अनेक जण सहभागी झाले. स्मशाभूमीत पाणी पाजण्यासाठी मृतदेह उघडण्यात आला. मात्र दुसऱ्या दिवशी मृत व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने हिराघाट परिसरात एकच खळबळ उडाली. महापालिका आरोग्य विभागाने ७० पेक्षा जास्त जणांना विलगीकरण करून अनेकांचे स्वॉब घेतले. त्यापैकी १९ जणांला कोरोनाचा संसर्ग झाला. तर अनेकांचे अहवाल येणे बाकी आहे. 

यापूर्वी याच परिसरातील खन्ना कंपाऊंडमध्ये अशाच प्रकार घडला असून, अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या पैकी २५ पेक्षा जास्त जणांना कोरोनाचा संसर्ग झाला. मध्यवर्ती रुग्णालयाने मागचा प्रकार विचारात घेऊन मृतदेह पोलीस व महापालिका कर्मचारी समक्ष नातेवाईकांच्या ताब्यात दिला असता तर, असा पुन्हा प्रकार घडला नसता. असे नागरिकांचे म्हणणे आहे. खन्ना कंपाऊंड येथे असा प्रकार घडल्यानंतर, तत्कालीन महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी संशयित कोरोना रुग्ण मृतदेह परस्पर नातेवाईक यांच्या ताब्यात देण्यापूर्वी त्याची माहिती स्थानिक पोलीस स्टेशन व पालिका प्रभाग समितीला द्या. असे पत्र रुग्णालयाला दिले. मात्र त्यानंतर असे प्रकार मध्यवर्ती रुग्णालयाकडून वारंवार घडत असल्याने रुग्णालयाच्या प्रशासनावर टीकेची झोड उठली आहे, खन्ना कंपाऊंड प्रकरणी मृत व्यक्तीच्या तिघा नातेवाईकावर पालिकेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला होता.कोरोना संशयिताचा अहवाल आल्याशिवाय मृतदेह देऊ नयेमध्यवर्ती रुग्णालयात कोरोना संशयित रुग्णाचा मृत्यू झाला असेल तर, कोरोना अहवाल आल्या शिवाय त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देऊ नये. अशी विनंती शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी मध्यवर्ती रुग्णालयासह इतर रुग्णालयांना केले. महापालिकेने नागरिकांच्या सुरक्षेच्या कारणावरून तसा लेखी आदेश काढण्याची मागणी चौधरी यांनी केली.

हेही वाचा!

CoronaVirus: खबरदार! राज्यात सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास, धूम्रपान केल्यास दंडासह शिक्षा ठोठावली जाणार

जैन समाजाच्या साधू-साध्वींना प्रवास करण्यास सरकारची परवानगी, पण 'हे' नियम पाळावे लागणार 

CoronaVirus: विद्यापीठांच्या परीक्षांबाबतची अनिश्चितता संपणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे ठोस तोडगा काढण्याचे निर्देश

CoronaVirus: अनर्थ टळला! एअर इंडियाचं विमान आकाशात असतानाच वैमानिक पॉझिटिव्ह निघाला अन्...

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस