Ulhasnagar Rain: उल्हासनगरात संततधार पाऊस, वालधुनी नदी वाहते दुथडी भरून 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 05:51 PM2021-07-21T17:51:51+5:302021-07-21T17:52:07+5:30

उल्हासनगरात संततधार पावसामुळे मुख्य मार्केट परिसरात शुकशुकाट असून व्यापारी ग्राहकांची वाट बघत असल्याचे चित्र होते.

In Ulhasnagar, continuous rain, the river Valadhuni flows | Ulhasnagar Rain: उल्हासनगरात संततधार पाऊस, वालधुनी नदी वाहते दुथडी भरून 

Ulhasnagar Rain: उल्हासनगरात संततधार पाऊस, वालधुनी नदी वाहते दुथडी भरून 

Next

सदानंद नाईक 
उल्हासनगर : संततधार पावसाने मयूर हॉटेल, गोल मैदान, शांतीनगर स्मशानभूमी चौक आदी सखल भागात पाणी साचले होते. शहर पश्चिम मध्ये झाड पडल्याची तर रमाबाई आंबेडकरनगर मध्ये साप निघाल्याची घटना घडली असून वालधुनी नदी दुथडी भरून वाहत आहे. 

उल्हासनगरात संततधार पावसामुळे मुख्य मार्केट परिसरात शुकशुकाट असून व्यापारी ग्राहकांची वाट बघत असल्याचे चित्र होते. गोलमैदान, शिरू चौक, मयूर हॉटेल, स्मशानभूमी चौक, कैलास कॉलनी, फर्निचर मार्केट परिसरात पावसाचे पाणी साचले होते. तर शहर पश्चिम मध्ये एक जुने झाड पडले असून आपत्कालीन विभागाने झाड हटविल्याची माहिती आपत्कालीन विभागाचे प्रमुख बाळू नेटके यांनी दिली. तर संततधार पडणाऱ्या पावसाने रस्ते खड्डेमय झाले. वालधुनी नदी दुथडी भरून वाहत असून उल्हासनगर पश्चिम रेल्वे स्टेशन कडे जाणाऱ्या एकमेव वालधुनी नदीवरील पूल पाण्याखाली गेला. तर समतानगर येथील मुख्य रस्त्यावर असलेला नाल्यावरील पूल धोकादायक झाला.

 महापालिका आपत्कालीन विभागाने वालधुनी नदी किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. सोमवारी व मंगळवारी नदीच्या पुराचे पाणी भारतनगर, शांतीनगर येथील गहूबाई पाडा, सम्राट अशोकनगर आदी परिसरसातील घरात गेले होते. पुराचा तडका बसलेल्या नागरिकांची राहण्याची व्यवस्था महापालिकेने शाळा, समाजमंदिर परिसरात केले होते. तर थारासिंग दरबार यांनी शेकडो नागरिकांच्या जेवणाची व्यवस्था केली होती

Web Title: In Ulhasnagar, continuous rain, the river Valadhuni flows

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.