शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

दिवा स्थानकात विरुद्ध दिशेने ट्रेन पकडण्याचा प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2020 02:06 IST

दिव्यामध्ये जेमतेम पाच लाखांची लोकसंख्या आहे़ यामध्ये सर्रासपणे नोकरदारवर्ग राहतो़ सर्व जणच बहुधा लोकलने प्रवास करतात़ त्यामुळेच दिवा स्थानकात लोकल पकडण्यासाठी खच्चून अशी गर्दी प्रवासीवर्गाची दिसते़ सध्या दिव्यात जलद लोकलला थांबा आहे़

मुंबईची जीवनवाहिनी समजली जाणारी लोकल पकडण्यासाठी प्रवासी जीव धोक्यात घालून फलाटाच्या विरुद्ध दिशेने ट्रेन पकडण्याचा प्रकार दिवा स्थानकात सकाळी ऐन गर्दीच्या वेळी सर्रासपणे घडत आहे़ पण याकडे पोलीस यंत्रणा दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास येते़ दिवा स्थानकात फलाट क्रमांक दोनवर सकाळी गर्दीच्या वेळी ९-१० वाजता सीएसएमटीकडे जाणारी धिमी लोकल पकडण्यासाठी नोकरदार-प्रवासी वर्ग जीव धोक्यात घालतो़

याच वेळेस फलाट क्रमांक तीनवरून जर जलद मार्गाने जाणारी कर्जत, कसारा, कल्याण किंवा अन्य कोणतीही लोकल आली तर इतक्या गर्दीने चढणाऱ्या प्रवासी-नोकरदार वर्गाच्या मोठ्या प्रमाणात अपघाताची शक्यता आहे़ यावर वेळीच लक्ष देऊन प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करून हा प्रकार थांबविणे गरजेचे असल्याचे मत दक्ष प्रवासी व्यक्त करीत आहेत.

लोकल प्रवासात गर्दीच्या वेळी अनेक अपघात घडतात़ डब्यात घुसू न देणे, ट्रेन पकडली तरी त्या प्रवाशाला ताटकळत फूटबोर्डवर बाहेर लोंबकळत ठेवून त्याच्या अपघाताचा व्हिडीओ काढणे; परंतु मदतीचा हात न देणे़ सर्व काही पद्धतशीरपणे दुसऱ्यांच्या जीवाचा खेळ करतात़ ‘तुमचा खेळ होतो, मात्र आमुचा जीव जातो’ या म्हणीप्रमाणे रेल्वे प्रवासी काटेकोरपणे इतर प्रवाशांशी वागताना दिसतात़शब्दांकन : जयेश गायकवाड‘फूटबोर्ड अडवणाºयांवर कारवाई करा’दिव्यामध्ये जेमतेम पाच लाखांची लोकसंख्या आहे़ यामध्ये सर्रासपणे नोकरदारवर्ग राहतो़ सर्व जणच बहुधा लोकलने प्रवास करतात़ त्यामुळेच दिवा स्थानकात लोकल पकडण्यासाठी खच्चून अशी गर्दी प्रवासीवर्गाची दिसते़ सध्या दिव्यात जलद लोकलला थांबा आहे़ परंतु सीएसएमटीकडे जाणारी जलद लोकल पकडण्यासाठी जर सकाळी ९ ते १० दरम्यान प्रयत्न केला तर ग्रुपने फूटबोर्ड अडवून उभे राहणारे प्रवासी फलाटावरील प्रवाशांना आत येण्यास मज्जाव करतात़ यातून जर प्रवासी चढलाच तर त्याला ताटकळत प्रवास करायला भाग पाडतात़ यातून त्या प्रवाशाचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही़ रेल्वे अधिनियमानुसार अशा अडवणूक करणाºया प्रवाशांवर कारवाईची मागणी दिव्यातील नोकरदार प्रवाशांकडून होत आहे़

टॅग्स :railwayरेल्वे