धबधब्यात बुडून दोन तरुणांचा दुदैवी मृत्यू!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2020 21:17 IST2020-08-13T21:17:14+5:302020-08-13T21:17:37+5:30
संपूर्ण ठाणे जिल्ह्यात पावसाळी पर्यटनांवर बंदी आसतांना देखील पर्यटक तालुक्यातील पर्यटक स्थळावर जातातच कसे असा प्रश्न उद्भवला आहे.

धबधब्यात बुडून दोन तरुणांचा दुदैवी मृत्यू!
- राजेश भांगे
टोकावडे : तालुक्यातील गडगे आंबेळे येथील सहा तरुण गुरुवारी दुपारी खोपीवली येथील डोंगरातील धबधब्यावर पोहण्यासाठी गेले होते. धबधब्याचा प्रवाह जोरात असल्याने सहा मुलांपैकी दोघे हे प्रवाह सोबत वाहत आले.
या मुलांपैकी उमेश बोटकुडले २५ कार्तिक(बबल्या) गडगे २५ यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले असून एकाचा मृतदेह सापडला असून दुसरा मृतदेह शोधण्यासाठी अग्नीक्षमक दल व खोपीवली येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.
घटना स्थळी मुरबाड पोलिस देखील आहेत.मृतदेह शव विच्छेदनासाठी मुरबाड ग्रामिण रूग्णालयात आणण्यात आले आहे. या बाबत अकस्मित मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
संपूर्ण ठाणे जिल्ह्यात पावसाळी पर्यटनांवर बंदी आसतांना देखील पर्यटक तालुक्यातील पर्यटक स्थळावर जातातच कसे असा प्रश्न उद्भवला आहे.