तीन रिक्षांसह एक दुचाकी चोरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:45 IST2021-09-05T04:45:32+5:302021-09-05T04:45:32+5:30

ठाणे : कासारवडवली, चितळसर आणि श्रीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन रिक्षांसह एक दुचाकी चोरीला गेली. संबंधित पोलीस ठाण्यांत तक्रार ...

A two-wheeler with three rickshaws was stolen | तीन रिक्षांसह एक दुचाकी चोरीला

तीन रिक्षांसह एक दुचाकी चोरीला

ठाणे : कासारवडवली, चितळसर आणि श्रीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन रिक्षांसह एक दुचाकी चोरीला गेली. संबंधित पोलीस ठाण्यांत तक्रार दाखल झाली असून, या प्रकरणांचा पोलीस तपास करीत आहेत.

नळपाडा भागात उभी केलेली रिक्षा अनोळखी चोरट्याने चोरून नेली. फिर्यादीने ३१ ऑगस्टला आपली रिक्षा उभी करून ठेवली होती. बुधवार, १ सप्टेंबर रोजी रिक्षा चोरी गेल्याचे त्याच्या निदर्शनास आले. चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदण्यात आला असून, पोलीस तपास करीत आहेत. कावेसर भागात फिर्यादीने उभी केलेली रिक्षा अनोळखी चोराने चोरून नेल्याची घटना ३० ते ३१ ऑगस्ट दरम्यान घडली. कासारवडली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत. याच पोलीस ठाण्याच्या हद्दीत फिर्यादीने वाघबीळ भागात उभी केलेली रिक्षा चोरीला गेली. कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. अन्य एका घटनेत श्रीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत फिर्यादीने शिवाजीनगर वागळे इस्टेट भागात उभी केलेली दुचाकी चोरीला गेली. श्रीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तक्रार दाखल करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

.............

वाचली

Web Title: A two-wheeler with three rickshaws was stolen