भिवंडीतून दुचाकी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:46 IST2021-09-23T04:46:03+5:302021-09-23T04:46:03+5:30

-------------- भिवंडीतील हद्दपार गुन्हेगारांना केली अटक लोकमत न्यूज नेटवर्क भिवंडी : गैरकृत्यातील दोन आरोपींना शहरातून हद्दपार केले असतानाही ते ...

Two-wheeler stolen from Bhiwandi | भिवंडीतून दुचाकी चोरी

भिवंडीतून दुचाकी चोरी

--------------

भिवंडीतील हद्दपार गुन्हेगारांना केली अटक

लोकमत न्यूज नेटवर्क

भिवंडी : गैरकृत्यातील दोन आरोपींना शहरातून हद्दपार केले असतानाही ते शहरात वावरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांना पुन्हा अटक करण्यात आली.

पहिल्या घटनेत परवेज अहमद हाजी अहमद आमीन मोमीन (४५, रा. इस्लामपुरा) याला ठाणे शहर, ठाणे ग्रामीण, मुंबई शहर व उपनगरे या जिल्ह्यातून महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५६ प्रमाणे एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. मात्र, तो भिवंडी मनपा कार्यालयाजवळील आंबेडकर पुतळ्याच्या मागील गल्लीत आल्याची माहिती भिवंडी गुन्हे शाखा २ चे पोलीस कर्मचारी श्रीधर हुंडेकरी यांना खबऱ्यामार्फत मिळाली होती. त्यानुसार त्याला ताब्यात घेण्यात आले.

दुसऱ्या घटनेत शाहिद अब्दुल मुनाफ चौधरी ऊर्फ शाहिद चम्मच (२१, रा. चुन्नीशेठ बिल्डिंग, समदनगर, कणेरी) यालाही एक वर्षासाठी हद्दपार केले आहे. मात्र, तो मध्यवर्ती गुन्हे शोध कक्ष, ठाणे शहर येथील पोलीस कर्मचारी नासिर मजीद सय्यद यांना विक्रोळी पूर्व येथे कोळशाच्या दुकानात आढळून आला. त्यालाही ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, या दोघांविरोधात शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियमाप्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.

-------------

Web Title: Two-wheeler stolen from Bhiwandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.