विरुद्ध दिशेने आलेल्या कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:55 IST2021-02-20T05:55:19+5:302021-02-20T05:55:19+5:30

ठाणे : विरुद्ध दिशेने आलेल्या मोटारकारच्या धडकेत दुचाकीस्वार प्रदीप मिश्रा (२७, रा. काल्हेर, भिवंडी) हे गंभीर जखमी झाल्याची घटना ...

Two-wheeler injured in car collision | विरुद्ध दिशेने आलेल्या कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

विरुद्ध दिशेने आलेल्या कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

ठाणे : विरुद्ध दिशेने आलेल्या मोटारकारच्या धडकेत दुचाकीस्वार प्रदीप मिश्रा (२७, रा. काल्हेर, भिवंडी) हे गंभीर जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी गुरुवारी कापूरबावडी पोलीस ठाण्यात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिश्रा हे त्यांच्या मोटारसायकलने १३ फेब्रुवारी २०२१ रोजी दुपारी २.२० वाजेच्या सुमारास बाळकूम येथून मुंबईकडे जात होते. त्याचवेळी माजीवडा येथील उड्डाणपुलावरून एक मोटारकार विरुद्ध दिशेने आली. याच कारच्या धडकेने मिश्रा हे मोटारसायकलीवरून खाली पडले. यात त्यांच्या उजव्या पायाच्या पंजाला गंभीर दुखापत झाली. तसेच उजव्या आणि डाव्या हाताच्या दंडावरही मार लागून ते जखमी झाले. यात त्यांच्या मोटारसायकलचेही मोठे नुकसान झाले. अपघातानंतर तिथून पसार झालेल्या कारचालकाचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. सहायक पोलीस निरीक्षक व्ही. व्ही. मोसमकर हे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Two-wheeler injured in car collision