वाहनाच्या धडकेत दोघा दुचाकीस्वारांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:41 IST2021-05-19T04:41:26+5:302021-05-19T04:41:26+5:30

मुंब्राः अवजड वाहनाने दुचाकीला धडक दिल्यामुळे त्यावर बसलेल्या करण राठोड (१२) या अल्पवयीन मुलासह संतोष ...

Two two-wheelers killed in vehicle collision | वाहनाच्या धडकेत दोघा दुचाकीस्वारांचा मृत्यू

वाहनाच्या धडकेत दोघा दुचाकीस्वारांचा मृत्यू

मुंब्राः अवजड वाहनाने दुचाकीला धडक दिल्यामुळे त्यावर बसलेल्या करण राठोड (१२) या अल्पवयीन मुलासह संतोष चव्हाण (३०) यांचा घटनास्थाळावर मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री मुंब्रा बायपास रस्त्यावर घडली. ते आंबेडकर वाडी येथे राहात होते. दोघे ठाण्याच्या दिशेने दुचाकीने चालले होते. त्यावेळी एका अवजड वाहनाने दुचाकीला धडक दिली. यामुळे दुचाकीचे संतुलन बिघडल्याने दोघे रस्त्यावर पडले. त्याचवेळी शरीरावरून वाहनाचे चाक गेल्याने गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची खबर न देता तसेच जखमींना औषधौपचारांसाठी रुग्णालयात न नेता पसार झालेल्या अनोळखी वाहनचालकाविरोधात वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करून वाहन चालवल्याचा गुन्हा दाखल केल्याचे मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी सांगितले.

Web Title: Two two-wheelers killed in vehicle collision