भिवंडी दोन हजार विद्यार्थ्यांनी घातले १०८ सूर्यनमस्कार
By नितीन पंडित | Updated: February 9, 2024 17:50 IST2024-02-09T17:49:48+5:302024-02-09T17:50:14+5:30
विद्यार्थ्यांना आरोग्याचे महत्व पटवून देत असताना सुदृढ आरोग्यासाठी योगाभ्यास करणे गरजेचे आहे यासाठी पतंजली योग संस्थेच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात शहरातील खाजगी व मनपा शाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते.

भिवंडी दोन हजार विद्यार्थ्यांनी घातले १०८ सूर्यनमस्कार
भिवंडी: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भिवंडीत माजी उप महापौर मनोज काटेकर यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या सूर्यनमस्कार या विशेष कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी केले होते. .यामध्ये कमातघर परिसरातील २१ शाळांमधील २०७१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेत १०८ सूर्यनमस्कार घालत मुख्यमंत्री शिंदे यांचा वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला.
विद्यार्थ्यांना आरोग्याचे महत्व पटवून देत असताना सुदृढ आरोग्यासाठी योगाभ्यास करणे गरजेचे आहे यासाठी पतंजली योग संस्थेच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात शहरातील खाजगी व मनपा शाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.स्व.मोतीराम काटेकर क्रीडांगणा वर आयोजित या कार्यक्रमात माजी उप महापौर मनोज काटेकर,माजी नगरसेविका वंदना काटेकर यांसोबत पतंजली संस्थेचे डॉ तरुलभाई व्यास,सुरेश यादव,पोपटराव कदम,माजी प्राचार्य पी एन पाटील,राम पाटील,शरद म्हात्रे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.