शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रग्ज-दहशतवादाची साखळी घातक, विकासाचे जुने मॉडेल बदलायची गरज; PM नरेंद्र मोदींचं प्रतिपादन
2
आजचे राशीभविष्य, २३ नोव्हेंबर २०२५: यश मिळेल, प्रतिष्ठा उंचावेल; पण पाण्यापासून सावधान!
3
भाजपा नेत्यानं जिथं कानशिलात लगावली, तिथेच अपमानाचा वचपा काढण्यासाठी शिंदेसेनेचा जल्लोष
4
भाजपचे नेतेच पसरवत आहेत राज्यात भाषिक प्रांतवादाचे विष; उद्धव ठाकरे यांची टीका
5
शिंदेसेनेकडून ४० संपर्कप्रमुखांची नियुक्ती; निवडणुकीपर्यंत जिल्ह्यातच थांबण्याचे आदेश
6
कुजबुज! आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेली शिवसेना ठाण्यात भाजपासमोर नांगी टाकते का? चर्चा सुरू
7
'नॉमिनी' ही मालमत्तेची केवळ 'कायदेशीर विश्वस्त'; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
8
पुणे पोलिसांची मध्य प्रदेशात धडक कारवाई; शस्त्रसाठ्यांचे अड्डे उद्ध्वस्त, ५० भट्टया नष्ट
9
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
10
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
11
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
12
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
13
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
14
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
15
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
16
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
17
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
18
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
19
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
20
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठ्यावरून पालिकेची दोन संदिग्ध प्रतिज्ञापत्रे , विरोधी पक्षनेत्याचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 03:52 IST

पाण्याच्या लक्षवेधीनिमित्ताने ठाणे महापालिका प्रशासन कशी दिशाभूल करत आहे, याचा प्रत्यय बुधवारच्या महासभेत आला.

ठाणे : पाण्याच्या लक्षवेधीनिमित्ताने ठाणे महापालिका प्रशासन कशी दिशाभूल करत आहे, याचा प्रत्यय बुधवारच्या महासभेत आला. बांधकामबंदी घालण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने दिला असताना २०२५ पर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा असल्याचे प्रतिज्ञापत्र पालिकेने न्यायालयाला दिले होते. दुसरीकडे खाडीतील पाणी शुद्ध का करावे, यासाठी जे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे, त्यात २०१६ मध्येच पाणीपुरवठ्याची क्षमता संपली असल्याचा उल्लेख केला आहे. अशा पद्धतीने दोन प्रतिज्ञापत्रांमध्ये अशी गफलत कशी झाली, असा सवाल विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी केला. त्यामुळे प्रशासन मात्र चांगलेच अडचणीत आल्याचे दिसून आले.महासभेत पुन्हा पाणीसमस्येवर लक्षवेधी सुरूहोती. तिला प्रशासन उत्तर देत होते. परंतु, त्याच वेळेस विरोधी पक्षनेत्यांनी पालिका, न्यायालय आणि सभागृहाची कशी दिशाभूल करत आहे, याचा पुरावाच सभागृहात सादर केला.ज्या वेळेस पाण्याच्या समस्येवरून न्यायालयाने घोडबंदर भागात नवीन बांधकामांना परवानगी देऊ नये, असा निकाल दिला होता. त्यावेळेस आपली बाजू मांडताना पालिकेने २०२५ पर्यंत शहराला पुरेसा पाणीपुरवठा कसा होऊ शकतो, याचे प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्यानंतर, येथील बांधकामबंदी उठवण्यात आली. परंतु, कळवा खाडीतील खारे पाणी शुद्ध करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी ठाणे महापालिकेने यासंदर्भातील समितीपुढे ठाणे शहराला आजघडीला कमी प्रमाणात पाणीपुरवठा होत असून त्याची क्षमता २०१६ मध्येच संपली असल्याचे स्पष्ट केले. २०२१ पर्यंत १५० हून अधिक दशलक्ष लीटर पाण्याची गरज शहराला लागणार असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद आहे. एकीकडे २०२५ पर्यंत पुरेल एवढे पाणी असल्याचे प्रशासन न्यायालयाला सांगत आहे आणि दुसरीकडे समितीपुढे मात्र पाणीपुरवठा पुरेसा नसल्याचे प्रतिज्ञापत्र देते. अवघ्या काही महिन्यांत दोन प्रतिज्ञापत्रे सादर करून पालिकेने न्यायालयासह सभागृहाची दिशाभूल केली असून यातील नेमके कोणते खरे आहे, याचा खुलासा प्रशासनाने करावा, अशी मागणी त्यांनी लावून धरली.विरोधक आक्रमकविरोधकांनी प्रशासनाला घेरल्यानंतर, याबाबत अभ्यास करून पुढील निर्णय सांगू, असे साधकबाधक उत्तर प्रशासनातर्फे देण्यात आले. त्यामुळे विरोधक आणखी आक्रमक झाले. अखेर, जेवणाची सुटी जाहीर करून सत्ताधाऱ्यांसह प्रशासनाने यातून काढता पाय घेतला.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणे