४६ लाख चोरीप्रकरणी दोन संशयित ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:41 IST2021-03-27T04:41:36+5:302021-03-27T04:41:36+5:30

टोकावडे : मुरबाड-कल्याण महामार्गावरील सोनारपाडा येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुरबाड शाखेतील एटीएममधून ४६ लाख चोरीप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात ...

Two suspects arrested in Rs 46 lakh theft case | ४६ लाख चोरीप्रकरणी दोन संशयित ताब्यात

४६ लाख चोरीप्रकरणी दोन संशयित ताब्यात

टोकावडे

: मुरबाड-कल्याण महामार्गावरील सोनारपाडा येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुरबाड शाखेतील एटीएममधून ४६ लाख चोरीप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

एटीएममधून ४५ लाख ९८ हजार २०० रुपये चोरीला गेल्याचे बुधवारी बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. याबाबत स्टेट बँकेच्या अधिकाऱ्यांनी मुरबाड पोलीस ठाण्यात रितसर फिर्याद नोंदवली. एटीएममधून रक्कम काढण्यासाठी आलेल्या ग्राहकांना पैसे निघत नसल्याचे लक्षात आले. रक्कम शिल्लक नसल्याची माहिती ग्राहकांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना दिली.

त्यामुळे अधिक चौकशी केली असता २२ ते २४ मार्च दरम्यान ही रक्कम गायब झाल्याचे लक्षात येताच मुरबाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी मुरबाड पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून दोन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोराटे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Two suspects arrested in Rs 46 lakh theft case