चाकूच्या धाकाने चहा विक्रेत्याला दोघांनी लुबाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:24 IST2021-03-30T04:24:30+5:302021-03-30T04:24:30+5:30

ठाणे : चाकूच्या धाकावर भीमराज गैरी (३१, रा. मानपाडा, ठाणे) या चहा विक्रेत्याला दोघांनी लुबाडल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. ...

The two stabbed the tea seller with a knife | चाकूच्या धाकाने चहा विक्रेत्याला दोघांनी लुबाडले

चाकूच्या धाकाने चहा विक्रेत्याला दोघांनी लुबाडले

ठाणे : चाकूच्या धाकावर भीमराज गैरी (३१, रा. मानपाडा, ठाणे) या चहा विक्रेत्याला दोघांनी लुबाडल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात रविवारी जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.

मानपाडा येथे राहणारे भीमराज गैरी हे त्यांचा मेहुणा हिरालाल गैरी यांच्या आझादनगर बसथांब्याच्या मागील तुळसा चाय सेंटरच्या बाजूला असलेल्या ‘महालक्ष्मी ओल्ड पेपर मार्ट’ या भंगाराच्या दुकानात २७ मार्चला दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास बसले होते. त्याचवेळी तिथे आलेल्या २२ ते ३० वयोगटांतील दोन लुटारूंनी त्यांच्याकडे येऊन पैशांची मागणी केली. त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर या दोघांनी त्यांना मारहाण करून चाकूच्या धाकाने त्यांच्याकडील आठ हजारांची रोकड जबरीने लुबाडली. याप्रकरणी २८ मार्चला गुन्हा दाखल झाला असून पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील हे अधिक तपास करत आहेत.

Web Title: The two stabbed the tea seller with a knife