कोपरीमध्ये तलवारीच्या धाकावर लुटमार करणाऱ्या दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 21:59 IST2021-02-23T21:58:15+5:302021-02-23T21:59:23+5:30

कोपरीमध्ये तलवारीच्या धाकावर नयन पिंगुळकर (४८, सिद्धार्थनगर, कोपरी, ठाणे) यांच्याकडून साडे तीन हजारांची लूट करणाºया परमेश्वर रेड्डी (४६, मस्ताननगर, कोपरी, ठाणे) आणि मुरली रेड्डी (२३) या दोघांना कोपरी पोलिसांनी सोमवारी अटक केली.

Two robbers arrested in Kopari | कोपरीमध्ये तलवारीच्या धाकावर लुटमार करणाऱ्या दोघांना अटक

कोपरी पोलिसांची कारवाई

ठळक मुद्देकोपरी पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: कोपरीमध्ये तलवारीच्या धाकावर नयन पिंगुळकर (४८, सिद्धार्थनगर, कोपरी, ठाणे) यांच्याकडून साडे तीन हजारांची लूट करणाºया परमेश्वर रेड्डी (४६, मस्ताननगर, कोपरी, ठाणे) आणि मुरली रेड्डी (२३) या दोघांना कोपरी पोलिसांनी सोमवारी अटक केली. त्यांच्याकडून दोन तलवारीही जप्त केल्या आहेत.
कोपरीतील बेकरी लाईन येथील गाळयामध्ये नयन पिंगुळकर हे २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास उपस्थित होते. त्यावेळी परमेश्वर आणि मुरली यांनी आपसात संगनमत करुन नयन यांचे मित्र बाबू यांच्याशी झालेल्या कौटुंबिक वादाचा राग मनात धरुन नयन यांच्या उपहारगृहातील गाळयामध्ये तलवार घेऊन जबरदस्तीने शिरकाव करुन त्यांना ठार मारण्याची धमकी दिली. तसेच नयन आणि त्यांचा कामगार पप्पू यांना तलवारीचा धाक दाखवून त्यांच्याकडील तीन हजार सहाशेची रोकड जबरदस्तीने लुटली. याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक ममता डिसुझा यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक डी. टी. धोंडे आणि जमादार गणेश कोळी यांच्या पथकाने परमेश्वर आणि मुरली या दोघांनाही २३ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास अटक केली.

Web Title: Two robbers arrested in Kopari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.