ठाण्यात डान्सबार सुरू असल्याने दोन पोलीस निरीक्षक निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:27 AM2021-07-20T04:27:47+5:302021-07-20T04:27:47+5:30

ठाणे : कोरोनाचे निर्बंध ठाण्यातील दुकानदारांपासून विद्यार्थ्यांपर्यंत साऱ्यांवर लागू असताना शहरातील भर वस्तीमध्ये खुल्लमखुल्ला डान्सबार सुरू असल्याची माहिती उघड ...

Two police inspectors suspended over dance bar in Thane | ठाण्यात डान्सबार सुरू असल्याने दोन पोलीस निरीक्षक निलंबित

ठाण्यात डान्सबार सुरू असल्याने दोन पोलीस निरीक्षक निलंबित

Next

ठाणे : कोरोनाचे निर्बंध ठाण्यातील दुकानदारांपासून विद्यार्थ्यांपर्यंत साऱ्यांवर लागू असताना शहरातील भर वस्तीमध्ये खुल्लमखुल्ला डान्सबार सुरू असल्याची माहिती उघड होताच गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या आदेशावरून पोलीस आयुक्त जयजित सिंह यांनी नौपाडा आणि वर्तकनगर येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना तडकाफडकी निलंबित केले. नौपाडा आणि वर्तकनगर विभागाच्या साहाय्यक पोलीस आयुक्तांची ठाणे शहर नियंत्रण कक्षामध्ये बदली केली. या संपूर्ण प्रकरणाची अतिरिक्त पोलीस आयुक्तांमार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

नौपाडा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील आम्रपाली आणि अँटीक पॅलेस हे दोन तसेच वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील नटराज हे तीन डान्सबार सर्रास सुरू असल्याची माहिती उजेडात आली. या डान्सबारमध्ये कोरोनाचे सर्व नियम पायदळी तुडवत बारबालांचा डान्स सुरू होता. ही धक्कादायक बाब उघड होताच गृहमंत्री वळसे-पाटील यांनी पोलीस महासंचालकांना चौकशीचे आदेश दिले. ठाण्याच्या आयुक्तांनी प्राथमिक चौकशीच्या आधारे नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले आणि वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांना सोमवारी सायंकाळी निलंबित केले. तर नौपाडा विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त नीता पाडवी आणि वर्तकनगर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त पंकज शिरसाट यांचीही कर्तव्यात कसूर केल्याने ठाणे शहर नियंत्रण कक्षामध्ये बदली केल्याची माहिती सूत्रांनी दिली. आम्रपाली, अँटीक पॅलेस आणि नटराज या तीन बारचा परवाना निलंबित केला.

...........

प्राथमिक चौकशीत नौपाडा आणि वर्तकनगर येथील तीन बार सुरू असल्याचे आढळल्यामुळे दोन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांवर निलंबनाची कारवाई केली तर दोन सहायक आयुक्तांची नियंत्रण कक्षात बदली केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.

जयजित सिंह, पोलीस आयुक्त, ठाणे शहर

¯¯¯जोड आहे.

............

वाचली.

Web Title: Two police inspectors suspended over dance bar in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.