तासाभराच्या अंतराने घोडबंदर रोडवर रिक्षातील दोन प्रवाशांचे मोबाईल हिसकावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 20:28 IST2018-11-15T20:18:19+5:302018-11-15T20:28:09+5:30

एरव्ही, पायी जाणाऱ्या महिलांचे मंगळसूत्र हिसकावणा-या चोरटयांनी आता आपला मोर्चा रिक्षातून जाणा-या प्रवाशांकडे वळविला आहे. बुधवारी रात्री ८.३० ते ९.३० या अवघ्या एक तासाभराच्या अंतरातच चोरटयांनी दोन प्रवाशांच्या हातातील मोबाईल हिसकावून पळ काढला.

Two passengers of mobile phone rickshaw caught on Ghodbunder road at hour intervals | तासाभराच्या अंतराने घोडबंदर रोडवर रिक्षातील दोन प्रवाशांचे मोबाईल हिसकावले

चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ठळक मुद्देठाण्यातील घटनाचितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलरिक्षा प्रवाशांनी घेतला धसका

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: अवघ्या तासाभराच्या अंतराने घोडबंदर रोडवरुन जाणा-या दोन रिक्षांमधील वेगवेगळया प्रवाशांचे महागडे मोबाईल हिसकावल्याच्या घटना बुधवारी रात्री ९ ते १० वाजण्याच्या सुमारास घडल्या. याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाले आहेत.
हिरानंदानी इस्टेट ‘रोझा रॉयल’ इमारतीमध्ये राहणारे विलियम लुईस (३५) हे बुधवारी रात्री ८.३० वा. च्या सुमारास रिक्षाने पेपर प्रोडक्ट कंपनी येथून कापूरबावडी उड्डाणपूलावरुन जात होते. रिक्षा उतरतीला असतांना डाव्या बाजूने मोटारसायकलवरुन आलेल्या दोन अनोळखींंपैकी मागे बसलेल्याने विलियम यांच्या हातातील मोबाईल जबरीने हिसकावून पळ काढला. तर दुस-या घटनेत हाईट पार्क जवळ राहणारे सुमंत महाजन हे १४ नोव्हेंबर रोजी रात्री ९.३० वा. च्या सुमारास कापूरबावडी ठाणे येथील सिनेवंडर मॉल समोरुन जात होते. त्यावेळी त्यांच्या रिक्षाच्या डाव्या बाजूने पांढ-या रंगाच्या मोटरसायकलवरुन आलेल्या दोघांपैकी मागे बसलेल्याने महाजन यांच्या हातातील दहा हजारांचा मोबाईल हिसकावून पळ काढला. अवघ्या तासाभराच्या अंतराने घडलेल्या या घटनांमुळे घोडबंदर रोडने जाणा-या रिक्षा प्रवाशांमध्ये धास्तीचे वातावरण आहे. या भागात वाहतूक आणि पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.

Web Title: Two passengers of mobile phone rickshaw caught on Ghodbunder road at hour intervals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.