फसवणुकीप्रकरणी दोन नायजेरियन युवकांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 04:46 AM2018-05-30T04:46:10+5:302018-05-30T04:46:10+5:30

खेकड्याचे निळे रक्त यूकेतील ‘केंट फार्मास्युटिकल लि. युके’ या कंपनीला औषध बनवण्यासाठी देण्याचे आमिष दाखवून तीन लाख ६६ हजारांची फसवणूक करणाऱ्या एजओकू

Two Nigerian youths arrested for fraud | फसवणुकीप्रकरणी दोन नायजेरियन युवकांना अटक

फसवणुकीप्रकरणी दोन नायजेरियन युवकांना अटक

Next

ठाणे : खेकड्याचे निळे रक्त यूकेतील ‘केंट फार्मास्युटिकल लि. युके’ या कंपनीला औषध बनवण्यासाठी देण्याचे आमिष दाखवून तीन लाख ६६ हजारांची फसवणूक करणाऱ्या एजओकू संडे ऊर्फ स्टॅनली संडे (४१) आणि ओनकांची अ‍ॅन्थोनी मडू (४०) या दोघा नायजेरियनना अटक केल्याची माहिती ठाण्याचे सहपोलीस आयुक्त मधुकर पांडेय यांनी दिली. आतापर्यंत या गुन्ह्यात तिघांना अटक करण्यात आली आहे.
अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे, अपर पोलीस आयुक्त प्रताप दिघावकर, उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांच्या नियंत्रणाखाली ठाकरे यांच्या पथकातील रणवीर बयेस, उपनिरीक्षक अशोक माने, वसंत शेडगे, पोलीस नाईक रवींद्र काटकर, चंद्रकांत वाळुंज, संजय बाबर, पोलीस शिपाई भगवान हिवरे आदींच्या पथकाने ही कामगिरी यशस्वी केली.

काय आहे गुन्ह्याची पद्धत
एजओकू संडे आणि ओनकांची मडू यांनी फेसबुक किंवा ई-मेलद्वारे अनेकांशी संपर्क करून त्यांची कंपनी भारतातून खेकड्याचे निळे रक्त खरेदी करते आणि त्याचा औषध बनवण्यासाठी वापर करते, असे भासवून त्यांचा (केंट फार्मास्युटिकल्स लि. यूके) भारतातील संचालक अब्दुल कादीर कच्छी आणि एजंट सतीश याच्यामार्फत मोठ्या प्रमाणावर रकमा वेगवेगळ्या बँकेच्या खात्यावर घेऊन ही रक्कम अब्दुल हा वेळोवेळी बँकेतून काढून घेत असे. त्यातील ६० टक्के रक्कम नायजेरियन आरोपी, तर ४० टक्के रक्कम अब्दुल स्वत:कडे ठेवत होता, असे तपासात उघड झाले आहे.
आंतरराष्टÑीय टोळी...
अटक केलेल्या आरोपींच्या तपासामध्ये अशा प्रकारे गुन्हा करणाºया गुन्हेगारांची आंतरराष्टÑीय टोळी असून ती सध्या भारतातील विविध राज्यांत सक्रिय असल्याची माहिती पुढे आली आहे. अब्दुल याच्याविरुद्ध यापूर्वी जानेवारी २०१८ मध्ये अशाच प्रकारे कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून त्यात त्याला अटकही झाली होती. तर, अ‍ॅन्थोनी मडू याच्याविरुद्ध मुंबईच्या कांदिवली पोलीस ठाण्यात २०१३ मध्ये एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आहे. या आंतरराष्टÑीय गुन्हेगारांच्या टोळीतील इतरांचाही शोध घेण्यात येत असल्याचे सहपोलीस आयुक्त पांडेय यांनी सांगितले.
गेल्या चार वर्षांपासून या कंपनीचे खाते सुरू आहे. त्यामुळे आणखीही कोणाची अशा प्रकारे फसवणूक झाली असल्यास त्यांनी ठाणे पोलिसांशी संपर्क साधावा. - मधुकर पांडेय, सहपोलीस आयुक्त, ठाणे शहर.

Web Title: Two Nigerian youths arrested for fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.