खेळण्यासाठी घराबाहेर पडलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा शिवाजी नगरच्या खाडीत बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 05:12 IST2017-09-19T05:12:20+5:302017-09-19T05:12:23+5:30

Two minor children drowning in the Bay of Shivaji Nagar to die for play | खेळण्यासाठी घराबाहेर पडलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा शिवाजी नगरच्या खाडीत बुडून मृत्यू

खेळण्यासाठी घराबाहेर पडलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा शिवाजी नगरच्या खाडीत बुडून मृत्यू

मुंबई : खेळण्यासाठी घराबाहेर पडलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा सोमवारी शिवाजी नगरच्या खाडीत मृतदेह आढळला. शमीम अख्तर शहा (७) आणि नसीम अख्तर शहा (५) अशी मृत भावांची नावे आहेत. याप्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.
गोवंडी शिवाजी नगर परिसरात समीर आणि नसीम कुटुंबियांसोबत राहतात. याच परिसरातील डम्पिंग ग्राऊण्डजवळ दोघेही सोमवारी खेळण्यासाठी बाहेर पडले होते. बराच वेळ होऊनही ते घरी न परतल्याने कुटुंबियांनी त्यांचा शोध सुरू केला. हाच शोध सुरू असताना रात्रीच्या दोघांचेही मृतदेह शिवाजी नगर येथील खाडीलगत आढळले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनास ते राजावाडी रुग्णालयात पाठविण्यात आले.

Web Title: Two minor children drowning in the Bay of Shivaji Nagar to die for play