भिवंडीत भंगार गोदामातील केमिकल ड्रमच्या स्फोटात दोन ठार, आवाजने परिसर हादरला

By नितीन पंडित | Updated: February 1, 2023 16:15 IST2023-02-01T16:15:27+5:302023-02-01T16:15:49+5:30

भंगार व्यवसायिक रमजान मोहम्मद जमील कुरेशी वय ४५ व मोहम्मद इस्राईल शेख वय ३८ असे केमिकल ड्रमच्या स्फोटात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत

Two killed in explosion of chemical drum in scrap warehouse in Bhiwandi, the sound shook the area | भिवंडीत भंगार गोदामातील केमिकल ड्रमच्या स्फोटात दोन ठार, आवाजने परिसर हादरला

भिवंडीत भंगार गोदामातील केमिकल ड्रमच्या स्फोटात दोन ठार, आवाजने परिसर हादरला

भिवंडीभिवंडी शहरालगत खोणी ग्रामपंचायतीतील तलवली नाका या ठिकाणी भंगार व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीच्या गोदामातील केमिकल ड्रम मधील केमिकलचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटने दोघाजणांचा जागेवर दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घरत कंपाऊंड येथे बुधवारी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास घडली आहे.

भंगार व्यवसायिक रमजान मोहम्मद जमील कुरेशी वय ४५ व मोहम्मद इस्राईल शेख वय ३८ असे केमिकल ड्रमच्या स्फोटात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत.हे दोघे गोदामात बसून भंगार व ड्रम मधील केमिकल तपासत असताना एक कामगार विडी पीत असल्याने त्याचा संपर्क केमिकल सोबत होऊन केमिकल ड्रम चा मोठा स्फोट झाला .या स्फोट मध्ये दोघे हे लांब फेकले गेले ज्यामध्ये या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 

या दुर्घटनेतील आवाज एवढा जबरदस्त होता की सुमारे तीन किलोमीटर परिसरात या स्फोटाने हादरा बसला.या घटनेची माहिती मिळताच भिवंडी अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी धावून आले.विशेष म्हणजे या केमिकल मुळे आग लागली नाही परंतु काही प्रमाणात धूर निघत होता.स्थानिक निजामपुरा पोलिसांनी घटनेची नोंद घेत दोन्ही मृतदेह शासकीय रुग्णालयात रवाना केले आहेत.परंतु ड्रम मध्ये नक्की कोणते केमिकल होते याची माहिती मिळू शकली नाही.

Web Title: Two killed in explosion of chemical drum in scrap warehouse in Bhiwandi, the sound shook the area