मुंबई - नाशिक महामार्गावर गाडी आणि दुचाकीच्या अपघातात २ ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 02:52 IST2017-09-04T02:52:49+5:302017-09-04T02:52:56+5:30

मुंबई - नाशिक महामार्गावरील आटगांव येथे गाडी आणि दुचाकीच्या अपघातात दोघे ठार तर तिघे जखमी झाले.

Two killed in a car and two-wheeler accident on Nashik highway | मुंबई - नाशिक महामार्गावर गाडी आणि दुचाकीच्या अपघातात २ ठार

मुंबई - नाशिक महामार्गावर गाडी आणि दुचाकीच्या अपघातात २ ठार

कसारा : मुंबई - नाशिक महामार्गावरील आटगांव येथे गाडी आणि दुचाकीच्या अपघातात दोघे ठार तर तिघे जखमी झाले.
आटगांव कॉम्प्लेक्सजवळ नाशिकहून मुंबईकडे जाणाºया गाडीने दुचाकी स्वारास जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील कल्पेश गुरुनाथ ठाणगे, (रा. शेरे, वासिंद) आणि आलोक पंडित (आसनगांव) हे गंभीररित्या जखमी झाले. शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. तर दुचाकीला धडक दिल्यानंतर ती गाडी शेतात उलटली. आणि त्यातील तिघे जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी एका रुग्णवाहिकेसह पोलीसही दाखल झाले. जखमींना रुग्णालयात दाखल केले असून त्यांची नावे अद्याप समजलेली नाहीत. याप्रकरणी शहापूर पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Two killed in a car and two-wheeler accident on Nashik highway

टॅग्स :Accidentअपघात