वेहळोली अपघातात दोन ठार; ८ जखमी
By Admin | Updated: June 10, 2017 01:07 IST2017-06-10T01:07:56+5:302017-06-10T01:07:56+5:30
मुंबई-नाशिक महामार्गावर शहापूर तालुक्यातील वेहळोली फाट्यावर झालेल्या भीषण अपघातात दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला

वेहळोली अपघातात दोन ठार; ८ जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे / आसनगाव : मुंबई-नाशिक महामार्गावर शहापूर तालुक्यातील वेहळोली फाट्यावर झालेल्या भीषण अपघातात दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ८ जण गंभीर जखमी झाले आहेत. मुंबईहून नाशिककडे जाणाऱ्या होंडा सिटी कारचे टायर फुटल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ती विरु द्ध दिशेने वेगाने येणाऱ्या इनोव्हा कारवर जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला.
यात डोंबिवली येथील शालिनी शंकर चौधरी (७०) आणि कीर्ती दिवाकर धांडे (४३) पनवेल या दोघींचा जागीच मृत्यू झाला. सुनीता परदेशी (३२), वीणा चौधरी (२८), जनार्दन गांगुर्डे (८०), यथा चौधरी (४), अब्दुल रजाक कलाम (५०) आणि मालेगाव येथील इब्रान शेख (४०), महम्मद रियाज (२८), श्रीनिवास झुझुवार (३५) या आठ जण जखमी झाले.