ठाण्यातील गॅस सिलेंडरच्या स्फोटात दोन जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2019 15:16 IST2019-09-08T15:09:51+5:302019-09-08T15:16:24+5:30
ठाण्यातील लुईलवाडी भागात गॅसची गळती झाल्याने आज (रविवारी) सिलेंडरचा भीषण स्फोट झाला.

ठाण्यातील गॅस सिलेंडरच्या स्फोटात दोन जण जखमी
ठाणे: ठाण्यातील लुईलवाडी भागात गॅसची गळती झाल्याने आज (रविवारी) सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. यामध्ये एका घरातील दोनजण जखमी झाले असून दोघांवर जवळच्या क्रिटिकेअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गॅसची गळती झाल्यामुळे आज सकाळी १० वाजून १० मिनिटांच्या आसपास हा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच अग्नशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच सदर घटनेत पीयूष शर्मा (४ वर्षे) आणि अनिता शर्मा (३० वर्षे) असे जखमींची नावे असून अनिता शर्मा या 70 – 80 टक्के भाजलेली असल्याने त्यांना पुढील उपचारा करिता ऐरोली येथील नॅशनल बर्न रूग्णालयात हलविण्यात येणार आहे.
घटनास्थळावरील तळ अधिक एक मजली चाळीचा धोकादायक झालेला भाग प्रादेशिक आपत्ती व्यवस्थान कक्षा कडून सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून काढण्यात आलेला आहे. सदर घटनास्थळी प्रा.आ.व्य.कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन केंद्राचे फायरमन तसेच टी.डी.आर.एफ. चे डेप्युटी कमांडट उपस्थित होते.