शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

मेघडंबरीच्या खर्चावरून शिवसेनेत दोन गट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 1:09 AM

दुरुस्तीसाठी एक कोटी मंजूर । प्रत्यक्षात कामाला सुरुवातच नाही

अंबरनाथ : येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांचा जुना पुतळा नव्या मेघडंबरीत बसविण्याचे काम पूर्ण झाले असून त्याचा लोकार्पण सोहळा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. मात्र या पुतळ्यासाठी जी मेघडंबरी उभारली आहे त्यासाठी एका बिल्डरने खर्च करणे चुकीचे असल्याचा आरोप करत उपनगराध्यक्षांनी त्या संदर्भात पालिका प्रशासनाला पत्र दिले आहे. मेघडंबरीच्या खर्चावरुन वाद निर्माण होताच त्या संदर्भात आता शिवसेनेतच दोन गट निर्माण झाले आहे. महाराजांच्या विषयाला विरोध करण्याची गरज काय असा आरोप आता शिवसेनेतील दुसरा गट करत आहे. महाराजांच्या विषयाला विरोध केल्याने उपनगराध्यक्षांना कोंडीत पकडायला सुरूवात झाली आहे.

या चौकात महाराजांच्या पुतळ्याच्या ठिकाणी नवीन दगडी मेघडंबरी उभारली आहे. दोन महिन्यांपासून त्याचे कामही सुरू होते. मात्र या मेघडंबरीच्या लोकार्पण सोहळ्याच्या तीन दिवस आधीपासून शिवसेनेत वाद सुरू आहे. उपनगराध्यक्ष अब्दुल शेख यांनी पालिका प्रशासनला पत्र देत मेघडंबरीचा खर्च बिल्डरकडून का घेतला असा सवाल केला. तसेच या चौकासाठी पालिकेने ५ लाखांचा निधी मंजूर केला होता तो कुठे गेला अशी विचारणा केली आहे. शेख यांच्या या पत्रामुळे शिवसेनेत दोन गट झाले. दुसऱ्या गटाने उत्तर देण्यास सुरूवात केल्याने हा वाद विकोपाला गेला आहे. समाजमाध्यमावरही चर्चा रंगली आहे. शेख यांच्या विरोधात राजकीय वातावरण पेटविले जात आहे.मोठे नेते अद्याप शांतहे काम बिल्डर स्वत: करुन देत असल्याने त्या अनुषंगाने पालिकेने रितसर ठराव केला आहे. त्याला योग्य त्या परवानग्या घेतल्या आहेत. विरोधच करायचा होता तर तो प्रस्ताव मंजुरीच्या वेळेस करणे गरजेचे होते. काम झाल्यावर विरोध करण्याची काहीही गरज नव्हती. या वादावर मोठ्या नेत्याकडून पडदा टाकण्यासाठी कोणताही प्रयत्न होताना दिसत नाही.

टॅग्स :thaneठाणेambernathअंबरनाथ