दोन गोदामांना लागली आग; मुंब्रा येथील घटना

By कुमार बडदे | Updated: April 17, 2023 10:17 IST2023-04-17T10:16:20+5:302023-04-17T10:17:43+5:30

त्या गोदामांना सोमवारी सकाळी भीषण आग लागली.

two godowns caught fire in mumbra | दोन गोदामांना लागली आग; मुंब्रा येथील घटना

दोन गोदामांना लागली आग; मुंब्रा येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंब्राः राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ जवळील शिळफाटा परीसरातील भट्टी गल्ली येथे असलेल्या दोन गोदामांमध्ये  टाकाऊ  कापडाच्या चिंध्या आणि पुठ्ठे प्रक्रिया करण्यासाठी जमा करुन ठेवण्यात आले होते.त्या गोदामांना सोमवारी सकाळी भीषण आग लागली.

या आगीत गोदामातील पुठ्ठे आणि चिंध्या जळून खाक झाल्या..आगीचे  रौद्र रुप बघून जळालेल्या गोदामांच्या आजूबाजूच्या   गोदामांचे मालक आणि स्थानिकांमध्ये खळबळ उडाली होती .शिळ अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन फायर वाहन आणि एक रेस्क्यू वाहनाच्या मदतीने दोन तासांच्या अथक प्रयत्नानी आग पूर्णपणे विझवली.आगीचे नेमकी कशामुळे लागली हे कळले नाही.सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती ठामपाच्या आपत्ती व्यावस्थापन कक्षातील अधिका-यांनी दिली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: two godowns caught fire in mumbra