ठाकरे गटाला धक्का; उल्हासनगरातील दोन माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 18:27 IST2025-08-30T18:27:18+5:302025-08-30T18:27:43+5:30

मध्यवर्ती शाखा कार्यालय शिंदेसेनेच्या ताब्यात

Two former corporators of Thackeray group join Shinde Sena in Ulhasnagar | ठाकरे गटाला धक्का; उल्हासनगरातील दोन माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश

ठाकरे गटाला धक्का; उल्हासनगरातील दोन माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश

सदानंद नाईक 
उल्हासनगर :
शिवसेना प्रमुख बाळासाहेब यांच्या हस्ते उदघाटन झालेल्या मराठा सेकशन येथील मध्यवर्ती शाखा अबाधित ठेवणारे माजी नगरसेवक शेखर यादव यांनी समर्थकासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेत प्रवेश घेतला. याप्रवेशाने ठाकरे सेनेला धक्का बसून पक्षाच्या मध्यवर्ती शाखा कार्यालयावर शिंदेसेनेने वर्चस्व निर्माण झाले.

उल्हासनगर मराठा सेकशन परिसर शिवसेनेचा गड असून येथील मध्यवर्ती शाखा कार्यालयाचे उदघाटन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते झाले होते. पक्षात फूट पडल्यानंतर माजी नगरसेवक व बहुसंख्य पदाधिकारी शिंदेसेनेत दाखल झाली. मात्र माजी नगरसेवक शेखर यादव यांनी मध्यवर्ती शाखा कार्यालय अबाधित ठेवून ठाकरेसेनेचा शहर कारभार याच शाखेतून चालत होता. कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख असलेले माजी नगरसेवक व उपशहरप्रमुख शेखर यादव, माजी नगरसेविका संगीता सपकाळे यांच्यासह त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थिती शुक्रवारी दुपारी ठाण्यातील शुभ दीप निवासस्थानी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख दिलीप गायकवाड, अरुण अशान, उल्हासनगर महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी आदीजण उपस्थित होते. 

माजी नगरसेवक शेखर यादव यांच्या सोबत विनायक खानविलकर, मिलिंद गावडे, मंगेश पालांडे, संजय भोईर, अनंता अमृते, सुनील जानवलेकर, राज पटेल, साबीर शेख, नितीन सपकाळे, शुभम सपकाळे, आयुष सपकाळे, रजा पीरजादे यांच्यासह अन्य जणांनी शिंदेसेनेत जाहीर प्रवेश केला. या सर्वांचे शिंदे साहेबांनी पक्षात स्वागत करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उल्हासनगर महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी, उपजिल्हाप्रमुख दिलीप गायकवाड, अरुण आशान, माजी नगरसेवक मंदार कीणी आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 प्रभागाचा विकास महत्वाचा.... शेखर यादव
 मराठा सेकशन येथील बहुतांश जून शिंदेसेनेत प्रवेश केल्यावर, पक्षाच्या मध्यवर्ती शाखेचा कारभार एकहाती हाकत होतो. महापालिका निवडणुका जवळ आल्याने, प्रभागातील विकासकामे व नागरिकांच्या समस्या सुटाव्या म्हणून शिंदेसेनेत प्रवेश घेतला आहे.

Web Title: Two former corporators of Thackeray group join Shinde Sena in Ulhasnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.