कोपरी येथे एका विवाहितेचे मंगळसूत्र हिसकावून दोघांचे पलायन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 21:07 IST2021-02-11T21:05:24+5:302021-02-11T21:07:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : चेंदणी कोळीवाडा, कोपरी येथे एका ४९ वर्षीय विवाहितेचे सोन्याचे मंगळसूत्र जबरीने हिसकावून दोघांनी मोटारसायकलवरुन ...

कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : चेंदणी कोळीवाडा, कोपरी येथे एका ४९ वर्षीय विवाहितेचे सोन्याचे मंगळसूत्र जबरीने हिसकावून दोघांनी मोटारसायकलवरुन पलायन केल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटयांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही महिला चेंदणी कोळीवाडा, कोपरी ठाणे पूर्व येथील डॉ. काळभोर यांच्या रुग्णालयाकडून चेंदणी कोळीवाडा साईनगरी येथे राहणाऱ्या तिच्या आईकडे ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास पायी जात होती. त्याचवेळी तिच्या पाठीमागून आलेल्या दोन मोटारसायकलस्वारांपैकी पाठीमागे बसलेल्याने तिच्या गळयातील ७० हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पलायन केले. सहायक पोलीस निरीक्षक मनिष पठाणे हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.