शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

बदलापूरमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कारला भीषण अपघात, दोघांचा मृत्यू तर पाच जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2019 17:53 IST

बारवी डॅम रोडवरुन येत असतांना सोनावळे गावाजवळ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कारला भीषण अपघात झाला.

 बदलापूर -  बारवी डॅम रोडवरुन येत असतांना सोनावळे गावाजवळ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कारला भीषण अपघात झाला. या अपघातात एक तरुण आणि एक तरुणी अशा दोघांचा मृत्यू झाला आहे. तर पाच जण जखमी झाले. या अपघातात जखमी झालेल्या पाचही तरुणांना उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

उल्हासनगर येथील एस.एस.टी महाविद्यालयातील 9 विद्यार्थी हे फिरण्यासाठी बारवी डॅम परिसरात गेले होते. यावेळी भरधाव वेगाने गाडी चालवित असतांना चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने ही गाडी सोनावळे गावाजवळील वळणावर उलटली. गाडीचा वेग जास्त असल्याने गाडी तीन ते चार वेळा उलटली. त्यामुळे या गाडीतील नुपम तायडे(18) आणि रुतिका कदम (18) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबत असलेले इतर सात जणांपैकी पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. तर उर्वरित दोघांना किरकोळ दुखापत झाली  आहे. गंभीर जखमींना लागलीच उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती चिंताजणक असल्याने त्यांना मुंबईच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. 

टॅग्स :Accidentअपघातbadlapurबदलापूर