कळवा येथे घरावर दरड कोसळली; 2 जणांचा मृत्यू तर 1 जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2019 08:36 AM2019-07-30T08:36:13+5:302019-07-30T08:37:51+5:30

आदर्श चाळीच्या बाजूला असणाऱ्या डोंगरामुळे ही दुर्घटना घडली आहे.

Two Dead And A Injued In Land Sliding In Kalwa Of Thane District | कळवा येथे घरावर दरड कोसळली; 2 जणांचा मृत्यू तर 1 जखमी 

कळवा येथे घरावर दरड कोसळली; 2 जणांचा मृत्यू तर 1 जखमी 

googlenewsNext

ठाणे - कळवा येथील अटकोनेश्वर नगरमधील आदर्श चाळीजवळ असलेल्या डोंगराचा काही भाग कोसळला. ही दरड चाळीवरील घरावर पडल्याने मातीच्या ढिगाऱ्यात 3 व्यक्ती अडकल्याची माहिती होती. घटनास्थळी अग्निशमन दल, पोलीस प्रशासनाकडून  रेस्क्यू ऑपरेशन सुरु करुन या तिघांना बाहेर काढलं.  

सोमवारी रात्री साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. बीरेंद्र गौतम जसवार या घरमालकाच्या घरावर ही दरड कोसळली. यामध्ये बीरेंद्र जसवार, त्यांच्या पत्नी नीलम जसवार आणि मुलगा सनी जसवार हे या दुर्घटनेत जखमी झाले होते. यामध्ये बीरेंद्र जसवार आणि सनी जसवार यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर नीलम जसवार यांच्यावर कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

आदर्श चाळीच्या बाजूला असणाऱ्या डोंगरामुळे ही दुर्घटना घडली आहे. त्याठिकाणची परिस्थिती पाहता प्रशासनाने खबरदारी म्हणून येथील 20 कुटुंबीयातील 70 लोकांना सुरक्षितस्थळी हलविले आहे. या लोकांच्या राहण्याची व्यवस्था ज्ञानगंगा शाळेमध्ये तात्पुरती करण्यात आली आहे. 

Web Title: Two Dead And A Injued In Land Sliding In Kalwa Of Thane District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.