विजेचा धक्का लागून दोन चुलत भावांचा मृत्यू; गावावर शोककळा
By पंकज पाटील | Updated: June 26, 2023 15:55 IST2023-06-26T15:36:57+5:302023-06-26T15:55:07+5:30
वांगणीजवळील ढवळे गावात एक फार्म हाऊसमध्ये विजेचा धक्का लागून दोन सख्ख्या चुलत भावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

विजेचा धक्का लागून दोन चुलत भावांचा मृत्यू; गावावर शोककळा
बदलापूर : वांगणी जवळील ढवळे गाव परिसरात राहणाऱ्या दोघा चुलत भावांचा फार्महाउसमध्ये विजेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे, तर त्यांचा तिसरा भाऊ थोडक्यात बचावला आहे. शनिवारी सायंकाळी हा प्रकार घडला असून या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.
वांगणीजवळील ढवळे गावात एक फार्म हाऊसमध्ये विजेचा धक्का लागून दोन सख्ख्या चुलत भावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. जयेश बैकर 19 आणि त्याचा चुलत भाऊ कुमार बैकर (वय 17) अशी या मुलांची नावे आहेत. जयेश हा फॉर्म हाऊसमधील कोंबड्यांच्या खुराड्याचा दरवाजा उघडण्यासासाठी गेला. मात्र त्या दरवाजात विद्युत प्रवाह उतरल्याने त्याला विजेचा जोरदार धक्का लागला. त्यांला वाचवण्यासाठी गेलेल्या कुमारलाही विजेचा धक्का लागून दोघांचा जागीच मृत्यू झाला.
या दोघांना पाहण्यासाठी आलेल्या त्यांचा तिसरा चुलत भावाचा सौम्य धक्का लागल्याने तो थोडक्यात बचावला. ढवळे गावातच फार्म हाऊसमध्ये स्विमिंग पूल होता आणि हा फार्म हाऊस कुमार आणि त्याच्या वडिलांनी चालवायला घेतले होते. त्याच ठिकाणी देखरेखित काम करीत असताना हा प्रकार घडला.