शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

उल्हासनदीत बुडून दोन मुलांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2018 10:11 PM

क्लाससाठी घराबाहेर पडलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा उल्हासनदीत बुडुन मृत्यू झाल्याची घटना गुरु वारी सायंकाळी पावणोपाचच्या सुमारास घडली. नितिन पप्पु विश्वकर्मा आणि शुभम उर्फ सोनू जयस्वाल अशी मृत मुलांची नावे आहेत.

 कल्याण - क्लाससाठी घराबाहेर पडलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा उल्हासनदीत बुडुन मृत्यू झाल्याची घटना गुरु वारी सायंकाळी पावणोपाचच्या सुमारास घडली. नितिन पप्पु विश्वकर्मा आणि शुभम उर्फ सोनू जयस्वाल अशी मृत मुलांची नावे आहेत. या दोघांचेही वय 13 होते. या घटनेची नोंद खडकपाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.शहाड येथील अवस्थी चाळीत राहणारा नितिन आणि उल्हासनगर गोलमैदानाजवळ येथील शुभम असे दोघेजण गुरु वारी दुपारी क्लासला जाण्यासाठी घराबाहेर पडले पण क्लासला न जाता ते उल्हास नदीत पोहण्यासाठी गेले. यावेळी त्यांच्यासोबत आणखीन एक मुलगा होता. तिघेही नदीत पोहण्यासाठी उतरले होते. मात्र तिघेही बुडू लागले. आजुबाजुच्या नागरीकांच्या हे निदर्शनास येताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यात  तिघांमधील एकाला वाचविण्यात यश आले. मात्र  अन्य दोघेजण  बेपत्ता झाल्याने कल्याण अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. परंतू घटनास्थळी पोहोचलेल्या अग्नीशामक दलाच्या जवानांच्या हाती नितिन आणि शुभम या दोघांचे मृतदेह लागले. या दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुक्मिणी बाई रु ग्णालयात पाठवण्यात आले असून वाचविण्यात आलेल्या अन्य एकाला त्याठिकाणी उपचारासाठी दाखल केले आहे. दरम्यान नदीत पोहण्यासाठी दोघेच उतरले होते आणि त्यात दोघांचाही मृत्यू झाल्याची माहीती खडकपाडा पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक बाळासाहेब कदम यांनी सांगितले. 

टॅग्स :Deathमृत्यूriverनदी