मुंब्य्रात वेगवेगळ्या ठिकाणी आढळले दोन मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 16:20 IST2021-09-18T16:16:44+5:302021-09-18T16:20:01+5:30
शहरात काही तासांच्या अंतराने गुरुवारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन मृतदेह आढळून आले.

मुंब्य्रात वेगवेगळ्या ठिकाणी आढळले दोन मृतदेह
मुंब्रा : शहरात काही तासांच्या अंतराने गुरुवारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन मृतदेह आढळून आले. यातील एका मृतदेहाची ओळख पटली असून, एक अनोळखी आहे. पहिला अनोळखी मृतदेह बायपास रस्त्याजवळ आढळून आला, तर दुसरा अब्दुल सत्तार (८५) यांचा मृतदेह येथील अमृतनगर परिसरातील योगी गृहसंकुलातील एका सदनिकेत आढळून आला. ते घरात एकटे राहात होते.