आगीत दोन दुचाकी जळून खाक; मुंब्रा शहरातील कौसा परीसरातील घटना
By कुमार बडदे | Updated: July 10, 2023 08:18 IST2023-07-10T08:17:54+5:302023-07-10T08:18:16+5:30
अग्निशमन दलाच्या जवानांनी एक फायर आणि एक रेस्क्यू वाहनाच्या मदतीने अल्पावधित आग विझवली.

आगीत दोन दुचाकी जळून खाक; मुंब्रा शहरातील कौसा परीसरातील घटना
मुंब्राः रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकींना लागलेल्या आगीत दोन दुचाकी जळून खाक झाल्याची घटना मुंब्रा शहरातील कौसा परीसरात सोमवारी मध्यरात्री घडली.जळालेल्या दुचाकी शहरातील कौसा भागातील आयडियल मार्केट जवळील रस्त्यावर पार्क करण्यात आल्या होत्या. सोमवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास दुचाकींना अचानक आग लागली असल्याची माहिती काही स्थानिक नागरीकांनी मुंब्रा अग्निशमन दलाच्या जवानांना दिली.
माहिती मिळताच घटनास्थळी पोहचलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी एक फायर आणि एक रेस्क्यू वाहनाच्या मदतीने अल्पावधित आग विझवली. आग विझेपर्यत दोन्ही दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्या.सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाले नसल्याची माहिती ठामपाच्या अप्तकालिन विभागातील अधिका-यांनी दिली.ही आग नेमकी कशामुळे लागली हे कळाले नाही.दरम्यान दुचाकींना लागलेल्या आगी बाबत विविध प्रकारचे तर्कवितर्क स्थानिक नागरीक व्यक्त करत होते.