मुंब्य्रातून रिक्षांची चोरी करणारे दोघे जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:26 IST2021-07-09T04:26:02+5:302021-07-09T04:26:02+5:30

ठाणे : मुंब्रा परिसरातून रिक्षांची चोरी करणाऱ्या फिरोज हनीफ मेमन (३६, रा. शैलेशनगर, मुंब्रा, ठाणे) याच्यासह दोघांना डायघर पोलिसांनी ...

Two arrested for stealing rickshaws from Mumbai | मुंब्य्रातून रिक्षांची चोरी करणारे दोघे जेरबंद

मुंब्य्रातून रिक्षांची चोरी करणारे दोघे जेरबंद

ठाणे : मुंब्रा परिसरातून रिक्षांची चोरी करणाऱ्या फिरोज हनीफ मेमन (३६, रा. शैलेशनगर, मुंब्रा, ठाणे) याच्यासह दोघांना डायघर पोलिसांनी मंगळवारी अटक केली. आरोपींमध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. त्याच्याकडून चार रिक्षाही जप्त केल्या आहेत.

शिबलीनगर भागातील रहिवासी नईम खान (५५) यांनी त्यांची रिक्षा भोलेनाथनगर येथील सिद्दीकी टॉवरच्या गेटसमोरील रस्त्यावर उभी केली होती. ती ४ जुलै २०२१ रोजी पहाटे १ ते सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास चोरीस गेली. याप्रकरणी त्यांनी ५ जुलै रोजी डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक भूषण कापडणीस यांच्या पथकाने ६ जुलै रोजी मुंब्रा येथून फिरोजला अटक केली. तर त्याआधी ५ जुलै रोजी त्याच्याच अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले. त्याला भिवंडी येथील बालसुधारगृहात ठेवण्याचे आदेश बालन्यायालयाने दिले आहेत. या दोघांकडून नईम यांच्या रिक्षासह अन्यही मुंब्रा परिसरातून चोरीस गेलेल्या रिक्षा हस्तगत केल्या आहेत.

Web Title: Two arrested for stealing rickshaws from Mumbai