मेट्रो रेल्वेचे लोखंड चोरणाऱ्या दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 05:36 IST2020-01-09T05:36:04+5:302020-01-09T05:36:08+5:30

ठाण्यात कोरम मॉलजवळ सुरू असलेल्या मेट्रो रेल्वेच्या कामाच्या ठिकाणावरून लोखंडी साहित्य चोरणा-या दोघांना वर्तकनगर पोलिसांनी बुधवारी पहाटे अटक केली.

Two arrested for stealing iron from Metro Railway | मेट्रो रेल्वेचे लोखंड चोरणाऱ्या दोघांना अटक

मेट्रो रेल्वेचे लोखंड चोरणाऱ्या दोघांना अटक

ठाणे : ठाण्यात कोरम मॉलजवळ सुरू असलेल्या मेट्रो रेल्वेच्या कामाच्या ठिकाणावरून लोखंडी साहित्य चोरणा-या दोघांना वर्तकनगर पोलिसांनी बुधवारी पहाटे अटक केली. त्यांच्याकडून चोरीतील तीन हजारांच्या लोखंडी प्लेट हस्तगत केल्या आहेत. आकाश जाधव (२७) आणि प्रकाश शिंदे (२८) अशी दोघांची नावे आहेत.
नितीन कंपनीजवळील मुंबई-ठाणे पूर्व द्रुतगती मार्गालगत मेट्रो रेल्वेचे काम सुरू आहे. तेथे ६ जानेवारीला सकाळी लोखंडी प्लेटची चोरी झाली होती. त्यामुळे कामात अडथळा निर्माण झाला होता. याप्रकरणी मेट्रो रेल्वेचे सुरक्षा पर्यवेक्षक आकाश घाटगे यांनी वर्तकनगर पोलीसांत तक्रार दाखल केली होती. संशयितांची माहिती पोलीस हवालदार एस.एच. भोसले यांना मिळाली होती. तिच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर आव्हाड यांच्या पथकाने आकाश, प्रकाशला ८ जानेवारीला पहाटे ताब्यात घेतले. या दोघांनाही न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

Web Title: Two arrested for stealing iron from Metro Railway