शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

रेमडेसीव्हरच्या इंजेक्शनची काळया बाजारात विक्री करणाऱ्या दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2021 18:05 IST

ठाण्यात रेमडेसिव्हीर या इंजेक्शनचा काळा बाजार करणाºया आतीफ परोग अंजुम (२२, रा. कुर्ला, मुंबई) आणि प्रमोद ठाकूर (३१, रा. भिवंडी) या दोघांना आता न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने शुक्रवारी दिले आहेत.

ठळक मुद्दे ठाणे खंडणी विरोधी पथकाने केली होती अटक

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ठाण्यात रेमडेसिव्हीर या इंजेक्शनचा काळा बाजार करणाºया आतीफ परोग अंजुम (२२, रा. कुर्ला, मुंबई) आणि प्रमोद ठाकूर (३१, रा. भिवंडी) या दोघांना आता न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने शुक्रवारी दिले आहेत. ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाने त्यांना अलिकडेच अटक केली होती.ठाण्यातील इंटरनिटी मॉल येथे आतीफ आणि प्रमोद हे दोघेही रेमडेसिविरच्या विक्रीसाठी १० एप्रिल रोजी आले होते. ते इंजेक्शनची चढया दराने विक्री करीत असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाला एका सामाजिक कार्यकर्त्याकडून मिळाली होती. त्याच आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांच्या पथकाने या दोघांनाही सापळा रचून अटक केली होती. एका इंजेक्शनची ते पाच हजारांमध्ये विक्री करीत होते. अंजूम हा ठाणे महापालिकेच्या पार्किग प्लाझा येथे मदतनीसाचे काम करतो. हे कोविड सेंटर चालविण्याचा ठेका असलेल्या ओम साई आरोग्य केअर या कंपनीने त्याला ब्रदर या पदावर नोकरीवर घेतले होते. महिना ३५ हजारांचा महिना असतांनाही त्याने याच हॉस्पीटलमधील १६ इंजेक्शन मिळवून ती बाहेर पाच हजारांमध्ये विक्री सुरु केली होती. त्याच्याकडून १६ इंजेक्शन जप्त केली आहेत. तर त्याचा साथीदार प्रमोद याच्याकडून पाच इंजेक्शन जप्त करण्यात आली आहेत.अंजुम याची या रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागातच नेमणूक असल्यामुळे त्याने या इंजेक्शनचा काळा बाजार करण्यास सुरुवात केली. या दोघांनाही १० एप्रिल रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर ठाणे खंडणी विरोधी पथकाने अंजूम आणि ठाकूर या दोघांनाही अटक केली. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात फसवणूकीसह जीवनावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल झाला होता. सुरुवातीला ११ ते १६ एप्रिल या काळात त्यांना पोलीस कोठडी मिळाली होती. याच कोठडीची मुदत शुक्रवारी (१६ एप्रिल रोजी) संपल्यानंतर त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना आणखी पोलीस कोठडीची मागणी खंडणी विरोधी पथकाने ठाणे न्यायालयात केली. मात्र, न्यायालयाने पोलिसांची ही मागणी फेटाळून लावली. पोलीस कोठडीऐवजी त्यांना ३० एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले. आता या प्रकरणात अन्यही कोणती टोळी सक्रीय आहे किंवा कसे? याचाही तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस