गावठी बनावटीचे रिव्हॉल्व्हर बाळगणाऱ्या दोघांना अटक; कोपरी पोलिसांची कारवाई

By जितेंद्र कालेकर | Updated: February 6, 2023 21:03 IST2023-02-06T21:02:59+5:302023-02-06T21:03:08+5:30

शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन

Two arrested for carrying Gavathi-made revolver; Kopri police action | गावठी बनावटीचे रिव्हॉल्व्हर बाळगणाऱ्या दोघांना अटक; कोपरी पोलिसांची कारवाई

गावठी बनावटीचे रिव्हॉल्व्हर बाळगणाऱ्या दोघांना अटक; कोपरी पोलिसांची कारवाई

ठाणे : कोपरीतील सिद्धार्थनगर भागात शिवसेना शाखेजवळ गावठी बनावटीचे रिव्हॉल्व्हर आणि दोन जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या स्वप्नील घोडके (१८, रा. शांतीनगर, ठाणे) आणि जोयल सालम (२०, रा. शांतीनगर, कोपरी, ठाणे) या दोघांना सोमवारी पहाटेच्या सुमारास पोलिसांनी अटक केली.

कोपरी भागात दोघेजण रिव्हॉल्व्हर घेऊन फिरत असल्याची माहिती कोपरी पोलिसांना मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर धोंडे आणि उपनिरीक्षक सूर्यवंशी यांच्या पथकाने स्वप्नील आणि जोयल या दोघांना सोमवारी अटक केली. त्यांच्याविरुद्ध शस्त्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला असून, त्यांनी हे शस्त्र कोणत्या कारणासाठी आणले, याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Two arrested for carrying Gavathi-made revolver; Kopri police action