जेवणासाठी तीन महिन्यांत अडीच कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 00:33 IST2020-07-28T00:33:39+5:302020-07-28T00:33:44+5:30

स्थायी समितीची मंजुरी : रुग्ण, डॉक्टरांना एकाच दर्जाचे जेवण दिल्याचा दावा

Two and a half crore for meals in three months | जेवणासाठी तीन महिन्यांत अडीच कोटी

जेवणासाठी तीन महिन्यांत अडीच कोटी

लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : महापालिकेने डॉक्टर, कर्मचारी आणि कोरोना रुग्णांना एकाच दर्जाचे जेवण दिले आहे. तीन महिन्यांत जेवणावर तब्बल दोन कोटींचा खर्च आला. बाटलीबंद पाण्यावर ५० लाखांपेक्षा जास्त खर्च झाला आहे. दिवसाला एका रुग्णावर ३१८ रुपये खर्च केले आहेत.
स्थायी समितीच्या सोमवारी झालेल्या आॅनलाइन सभेत सर्वपक्षीय सदस्यांनी एकमताने सर्वच विषयांना मान्यता दिली. रुग्ण, डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांच्या जेवणावरील खर्च, अग्निशमन विभागाला लागणारी साहित्य खरेदी, बाटलीबंद पिण्याचे पाणी, जंतुनाशक औषध खरेदी आदी विषयांना मंजुरी दिल्याची माहिती सभापती राजेश वधारिया यांनी दिली. एकूण रुग्ण, विलगीकरण कक्षात ठेवलेले संशयित रुग्ण, डॉक्टरसह इतर कर्मचाऱ्यांना २३ मार्च ते १० जुलैपर्यंत दिलेल्या जेवण व पिण्याच्या पाण्यावर सव्वा कोटी आणि ३२ लाख खर्च आला. २३ मार्च ते १२ जूनदरम्यान थाळीत अंडी, फळे व दुधाची भर पडली. महापालिकेने जेवणाबाबत रुग्ण, डॉक्टर आणि कर्मचारी असा भेदभाव न करता एकाच दर्जाचे जेवण दिल्याची माहिती सहायक आयुक्त मनीष हिवरे यांनी दिली. एका रुग्णाच्या जेवणावर दिवसाला ३१८ रुपये खर्च आल्याचे हिवरे म्हणाले.
पालकमंत्री एकनाथ शिंदे व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या रु ग्णालय भेटीनंतर रु ग्णांसह डॉक्टर व इतर कर्मचाºयांच्या जेवणात फळे, दूध व अंडी देण्यात येऊ लागली. १३ जून ते ११ जुलै या २८ दिवसांत जेवणावर ८० लाखांपेक्षा जास्त खर्च झाला. बाटलीबंद पिण्याच्या पाण्यावर ५० लाखांचा खर्च झाला आहे. या सर्व खर्चाला सोमवारी मान्यता देण्यात आली. एका व्यक्तीच्या जेवणावर ३१८ रुपये खर्च करूनही डॉक्टर आणि रुग्णांनी निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याचा काही दिवसांपूर्वी आरोप केला होता.

अग्निशमन जवानासाठी १२ हजारांचा गमबूट
महापालिकेने निविदा न काढता अग्निशमन विभागासाठी ४५ लाखांच्या विविध वस्तूंची खरेदी केली. यामध्ये अग्निशमन जवानांसाठी लागणारा एक गमबूट तब्बल १२ हजारांपेक्षा जास्त किमतीला खरेदी केला. तसेच एक कोटीचे फवारणीसाठी लागणारे औषध व जंतुनाशक, घरोघरी जाऊन आॅक्सिजन तपासणीसाठी लागणारे एकूण १५०० थर्मल स्कॅनर मशीन खरेदी केले आहेत. या सर्व वस्तूंच्या किमतीवर अनेकांकडून प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

Web Title: Two and a half crore for meals in three months