शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
4
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
5
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
6
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
7
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
8
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
9
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
10
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
11
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
13
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
14
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
15
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
16
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
17
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
18
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
19
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
20
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना

निवडणुकीच्या निकालानंतर गुरवांची वाजणार तुतारी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 1:52 AM

ठाण्यात शिवसेनेचा बोलबाला अधिक आहे. पण, निवडणुकीच्या निकालानंतर कोणाची तुतारी वाजणार, हे मात्र नक्की सांगू शकत नसल्याचे मत कोपरखैरणे येथील प्रसिद्ध तुतारीवादक लक्ष्मण गुरव यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केले.

- जितेंद्र कालेकर ठाणे : ठाण्यात शिवसेनेचा बोलबाला अधिक आहे. पण, निवडणुकीच्या निकालानंतर कोणाची तुतारी वाजणार, हे मात्र नक्की सांगू शकत नसल्याचे मत कोपरखैरणे येथील प्रसिद्ध तुतारीवादक लक्ष्मण गुरव यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केले. त्याचवेळी मानखुर्द येथील संदीप गुरव यांनी युतीचे सरकार येईल, अशी शक्यता व्यक्त केली आहे. सध्या या दोघांना ठाणे, नवी मुंबई, कल्याण परिसरांत राजकीय मेळावे, सभा, प्रचारफेऱ्यांमध्ये तुतारी वाजवण्याकरिता प्रचंड मागणी आहे.ठाणे जिल्ह्यातील ठाणे, भिवंडी आणि कल्याण या तिन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये प्रचार रॅली आणि चौक सभांनी चांगलाच जोर धरला आहे. प्रत्येक पक्षाने बॅनरबाजी करूनही आपला प्रचार सुरू केला आहे. प्रचारसभा, कार्यकर्ते मेळावे अशा ठिकाणी जेव्हा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या नेत्यांचे आगमन होते, तेव्हा तुतारी वाजवली जाते. उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे किंवा तत्सम मोठे नेते भाषणाला उभे राहतात, तेव्हा अगोदर तुतारी वाजते व मग शिवसेनेच्या किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयाच्या घोषणा होतात. त्यानंतर नेते बोलायला उभे राहतात. या प्रत्येक ठिकाणी तुतारी वाजवण्याकरिता गुरव यांना मोठ्या प्रमाणात आमंत्रणे येऊ लागली आहेत. ठाण्यात गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई आणि नवी मुंबईतून लक्ष्मण आणि त्यांचे मोठे भाऊ संदीप गुरव येतात. मूळ सांगली जिल्ह्यातील बत्तीसशिराळा तालुक्यातील असलेली ही भावंडे मुंबई, ठाण्यासह राज्यभरातील राजकीय कार्यक्रमांना तसेच लग्नसमारंभ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना हजेरी लावतात. बड्या नेत्यांचे किंवा सेलिब्रिटींचे आगमन म्हटले की, मराठमोळ्या तुतारीवादकांना आवर्जून पाचारण केले जाते. गावी अंबाबाईदेवीच्या आरतीच्या आधी आणि नंतर तुतारी वाजवण्याची प्रथा आहे. याच प्रथेमुळे पुढे शहरातही मुख्य राजकीय सभा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना तुतारी वाजवणाऱ्यांना मोठी मागणी वाढू लागली. लक्ष्मण गुरव यांच्यासह १० ते १५ जणांच्या ग्रुपला अशा सभांच्या ठिकाणी हमखास बोलवण्यात येते. लक्ष्मण यांचे भाऊ संदीप, भाचा प्रदीप गुरव आणि अन्य काही नातेवाईक विश्वास गुरव तसेच चंद्रकांत गुरव याच व्यवसायात स्थिरावले आहेत. ठाण्यात गुढीपाडव्यापासूनच राजकीय प्रचाराच्या कार्यक्रमांच्या आॅर्डर मिळाल्याचे लक्ष्मण सांगतात. यामध्ये शिवसेना, राष्टÑवादी काँग्रेस हे पक्ष आघाडीवर आहेत. पक्ष कार्यालयाचे उद्घाटन ते राजकीय मेळाव्यातील महत्त्वाचे सत्कार अशा वेळी तुतारी वाजवण्यास सांगितले जाते. शिवसेनेकडूनच मोठ्या प्रमाणात आॅर्डर मिळाल्याचेही ते म्हणाले. तुतारीवादन आणि फेटे बांधणे, अशी दुहेरी आॅर्डर मिळत असल्यामुळे तीन तासांचे दोन कलाकारांचे तीन हजार रुपये घेतले जातात. राजकीय कार्यक्रम बºयाचदा अगदी चार ते पाच तासांपर्यंतही लांबतात. अशावेळी चार हजार रुपये आकारून दोघांमध्ये प्रत्येकी दोन हजार घेत असल्याचे त्यांनी सांगितले.>राजकीय कार्यक्रमांच्या नियोजनाने दमछाकशिवसेनेचे खासदार राजन विचारे यांनी उमेदवारी अर्ज भरला, त्यादिवशीही ४०० फेटे आणि दोन तुतारीवादकांना आॅर्डर दिली होती, असे त्यांनी सांगितले. लग्नसराई आणि लोकसभा निवडणुकीची धामधूम एकत्र आल्याने आता मागणी पूर्ण करताना आम्हा मंडळींची मोठी कसरत होत आहे, असे ते म्हणाले. राजकीय परिस्थितीबद्दल आपण नेमके सांगू शकत नाही. तरीही सेनेचे वजन वाटते, असे मोकळेपणाने या तुतारीवादकांपैकी एकाने सांगितले. पण, निवडणुकीत तुतारी कोणाची वाजेल, हे सांगणे मात्र कठीण असल्याचे लक्ष्मण गुरव म्हणाले. ठाण्यात सध्या शिवसेनेपाठोपाठ, राष्टÑवादी आणि मनसेचीही तुतारीसाठी आमंत्रणे असतात, असे संदीप यांनी सांगितले. नवी मुंबईत असे कार्यक्रम राबवण्यात राष्टÑवादी काँग्रेस आघाडीवर असल्याचे ते सांगतात. संदीप ३० वर्षांपासून या व्यवसायात आहेत. राजकीय परिस्थितीविषयी ते म्हणाले, भाजपचा सध्या बोलबाला आहे. युतीचे सरकार पुन्हा येण्याची शक्यता वाटते. संदीप यांना मात्र अजून प्रचारसभांचे निमंत्रण आलेले नाही.