शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
4
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
5
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
6
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
7
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
8
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
9
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
10
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
11
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
12
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
13
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
14
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
15
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
16
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
17
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा
18
पाकच्या मुलीशी कॉन्स्टेबलचा विवाह राष्ट्रीय सुरक्षेला धोका; सीआरपीएफचे कोर्टात स्पष्टीकरण
19
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
20
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला

गारा आणि वाऱ्यासह वळवाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 02:14 IST

दुपारी उन्हाचा पारा ४२ अंशांवर असताना सायंकाळी अचानक आभाळ दाटून आले आणि सोसाट्याच्या वाºयासह बदलापुरात पावसाने जोरदार हजेरी लावली. तासभर कोसळलेल्या या वळवात काही ठिकाणी गाराही पडल्या.

बदलापूर : दुपारी उन्हाचा पारा ४२ अंशांवर असताना सायंकाळी अचानक आभाळ दाटून आले आणि सोसाट्याच्या वाºयासह बदलापुरात पावसाने जोरदार हजेरी लावली. तासभर कोसळलेल्या या वळवात काही ठिकाणी गाराही पडल्या. त्याने वातावरणात आल्हाददायक बदल झाला असला, तरी लग्नसराईवर विघ्न आले. कल्याण-डोंबिवलीत पावसाचा फक्त शिडकावा झाला, तर मुरबाडमध्ये पावसाने भाजीपाल्याचे नुकसान झाले.बदलापुरात अवकाळी पावसाचा कहर तासभर सुरू राहिला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. अनेक ठिकाणी पाणी साचले. गेले दोन दिवस पारा चढलेला होता. बदलापूर-अंबरनाथचा पारा मंगळवारी दुपारी ४२ अंशांवर गेला होता. उकाड्याने, घामाच्या धारांनी सारे हैराण झाले असताना सायंकाळी पाच-साडेपाचच्या दरम्यान सोसाट्याच्या वाºयासह पावसाने हजेरी लावली. या अवेळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. जोरदार पाऊस झाल्याने रस्त्यावर पाणी साचले होते. सर्वात मोठी कोंडी झाली ती लग्न समारंभांची. मंगळवार आणि बुधवार हे दोन्ही दिवस लग्नाचे मुहूर्त असल्याने बदलापुरात अनेक ठिकाणी लग्न समारंभ सुरू होते. त्यासाठी मांडव घातले होते. या पावसाने त्या समारंभातही व्यत्यय आला. पावसामुळे काही भागांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. पाऊस, त्यामुळे झालेली कोंडी यामुळे नागरिक नंतर घराबाहेर पडलेच नाहीत. अपवाद होता, तो परतणाºया चाकरमान्यांचा.बदलापुरात पावसाने हजेरी लावलेली असताना अंबरनाथमध्ये मात्र नागरिकांना सोसाट्याच्या वाºयाचा सामना करावा लागला. त्यामुळे सर्वत्र धूळ पसरली होती. सायंकाळी सहानंतर पावसाच्या हलक्या सरी पडल्या.मुरबाडला भाजीचे नुकसानमुरबाड : ग्रामीण भागासह मुरबाडच्या शहरी भागात वादळी वाºयांसह आलेल्या अवेळी पावसाने पिकांना झोडपून काढले. पाऊस येण्यापूर्वी दुपारी तीनपासूनच अनेक भागांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. तो पाच ते सहा तासांनंतरही पूर्ववत झाला नव्हता. पावसाने वीटभट्टी मालकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वादळामुळे राष्ट्रीय महामार्गावर किशोर, पोटगाव जवळ मोठे झाड पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. पोलीस, गावकरी व अग्नीशमन दलाच्या कर्मचाºयांनी तो तोडून बाजूला केले. तालुक्यात ठिकठिकाणी सध्या भेंडी, काकडी, टोमॅटो, पालेभाज्यांची लागवड झालेली होती. त्यांना पावसाने तडाखा दिला.मुंब्य्रात वीज नऊ तास खंडितमुंब्रा : वाºयाचा तडाखा बसण्यापूर्वीच मुंब्य्राच्या अनेक भागातील वीजपुरवठा मंगळवारी सकाळी १० ते संध्याकाळी सातदरम्यान म्हणजे सलग नऊ तास खंडित झाला होता. एकीकडे वाढत्या उन्हामुले काहिली आणि त्यात वीज बंदमुळे नागरिक हैराण झाले होते. पाणी पुरवठ्यावरही त्याचा परिणाम झाला. तांत्रिक कामे करण्यासाठी वीजपुरवठा खंडित केल्याची माहिती महावित्तरणचे कार्यकारी अभियंता पाडुरंग हुंडेकरी यांनी दिली.डोंबिवलीत आधी धूळधाण, नंतर शिडकावाप्रचंड उकाड्याने डोंबिवलीकर हैराण झाले असतानाच मंगळवारी संध्याकाळी आधी सोसाट्याच्या वाºयाने हजेरी लावत शहराची धूळधाण उडवून दिली. नंतर अचानक पावसाची जोरदार सर आली आणि नागरिकांवर शिडकावा करून गेली. संध्याकाळी पाच-साडेपाचच्या सुमारास वाºयामुळे प्रचंड धूळ उडाली.त्यामुळे रस्ते धुळीने माखले होते. पावसाला सुरु वात झालेली नव्हती, तरीही मातीचा गंध पसरल्याने पावसाची चाहूल लागली होती. तसा तो सहा- सव्वासहाच्या दरम्यान बरसून गेला.त्यात रस्ते ओलेचिंब झाले. नंतरही आकाश ढगाळलेले होते. पावसाची सर पडून गेल्यानंतरही वातावरणात उष्मा कायम होता. काही काळ ढगांचा गडगडाटही झाला.वीजपुरवठा खंडित : सोसाट्याचा वारा सुटल्यावर जवळपास संपूर्ण डोंबिवलीतील वीजपुरवठा महावितरणने खंडित केला होता. मात्र पावसाची सर कोसळून गेल्यावरही जवळपास तीन तासानंतर टप्प्याटप्प्याने तो पूर्ववत झाला. रस्ते काळोखात बुडाले होते. ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती.व्यापाºयांचा हिरमोड : बुधवारी अक्षय्य तृतीया असल्याने व्यवहारात तेजीची अपेक्षा असतानाच अचानक पडलेल्या पावसामुळे व्यापाºयांचा हिरमोड झाला. रिक्षा आंदोलनावरही त्याचा परिणाम झाला.लोकलचा खेळखंडोबापावसाने लोकलचा वेग मंदावलेला असतानाच आसनगाव लोकलमध्ये तांत्रिक बिघाडाची घटना कल्याणजवळ घडली. कोपर-दिवा मार्गावर लोकल कोंडी झाली होती.

टॅग्स :Rainपाऊस