मॅरेथॉन स्पर्धेची कोंडी करण्याचा प्रयत्न
By Admin | Updated: November 14, 2015 23:26 IST2015-11-14T23:26:06+5:302015-11-14T23:26:06+5:30
नोव्हेंबर रोजी होणाऱ्या पाचव्या मॅरेथॉन स्पर्धेला गालबोट लावण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. मॅरेथॉनच्या दिवशी ही स्पर्धा रोखण्यासाठी रास्तारोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मॅरेथॉन स्पर्धेची कोंडी करण्याचा प्रयत्न
वसई : नोव्हेंबर रोजी होणाऱ्या पाचव्या मॅरेथॉन स्पर्धेला गालबोट लावण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. मॅरेथॉनच्या दिवशी ही स्पर्धा रोखण्यासाठी रास्तारोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे. गेली ४ वर्षे होत असलेल्या या स्पर्धेसंदर्भात आता खर्चाची बाब उपस्थित करून स्पर्धेला कोंडीत आणण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे स्पर्धकांमध्ये नाराजी व्यक्त होऊ लागली आहे.
मॅरेथॉनचा विषय शहरात चर्चेचा असतांना काही राजकीय मंडळींनी २९ गावे, कब्रस्तान व अन्य बाबींचा संबंध जोडून रास्तारोको करण्याचे जाहीर केले आहे. ठाणे जिल्हापरिषदेचे माजी सदस्य समीर वर्तक यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात अनेक गैरलागू मुद्दे उपस्थित केले आहेत.
यामध्ये १९७०-८० च्या दशकातील वीजवाहक तारा आजही कार्यरत आहेत. वीजपुरवठा वारंवार खंडीत होत असतो, प्रलंबित कब्रस्तानाचा प्रश्न व खर्चाची बाब याकडे लक्ष वेधले आहे.
हे सर्व मुद्दे मॅरेथॉन स्पर्धेशी संबंधीत नसताना रास्तारोको करून क्रीडास्पर्धांना विरोध करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना विरोध करण्याच्या तयारीत स्पर्धक आहेत.