शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉट्सअ‍ॅप वादातून एकास जिवंत जाळण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2019 05:09 IST

राणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे फिर्यादी हे १५ मे २०१९ ला बुलेटवरून जात असताना त्यांचा पाठलाग करून

नालासोपारा : राजस्थानमधील पाली जिल्ह्यातील एकाला दोन तरूणांनी व्हॉट्सअपमुळे झालेल्या वादातून रस्त्यात अडवून मारहाण करून पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा १५ मे रोजी ला घडला होता. याप्रकरणी तेथील राणी पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. फरार असलेल्या या आरोपींना बुधवारी वसईतून वालीव पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांनी पकडून राणी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

राणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे फिर्यादी हे १५ मे २०१९ ला बुलेटवरून जात असताना त्यांचा पाठलाग करून सतपाल लिंबारामजी जणवा चौधरी (३०) आणि राजू लालचंद चौधरी (२८) या दोघांनी गाडी आडवी लावून अडवले. व्हॉट्सअप ग्रुपच्या पोस्ट वरून वाद घालत मारहाण केली. बाटलीमधील पेट्रोल फिर्यादीच्या अंगावर ओतल्यावर तो घाबरून बुलेट सोडून पळून गेला. सतपाल आणि राजूने बुलेट मोटारसायकलवर पेट्रोल टाकून ती जाळून टाकली. यानंतर पाली पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यावर ते फरार झाले होते.ते दोघे वसई पूर्वेकडील वालीवच्या हद्दीत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चौगुले यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर धायरकर, पोलीस उपनिरीक्षक विजय चव्हाण, पोलीस कर्मचारी महेश बोडके, योगेश घुगे आणि वीरकर यांच्या टीमने मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाळत ठेवली असता बुधवारी या दोघांना महामार्गावरील वासमारे ब्रिजजवळ अटक केली. 

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाWhatsAppव्हॉटसअ‍ॅप