दिल्लीच्या ट्रक चालकांची ५५ हजाराने फसवणूक
By सदानंद नाईक | Updated: October 4, 2023 17:40 IST2023-10-04T17:39:53+5:302023-10-04T17:40:11+5:30
मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

दिल्लीच्या ट्रक चालकांची ५५ हजाराने फसवणूक
उल्हासनगर: ट्रक कॅबिनच्या खिडकीतून मोबाईल चोरून मोबाईल मधील गुगल पे द्वारे बँक ऑफ बडोदा या बँकेतून ५२ हजार २०० रुपये यूपीआयद्वारे काढून ट्रक चालकांची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.
उल्हासनगर कॅम्प नं-३, विट्ठलवाडी रेल्वे स्टेशन येथील वेदांत कॉलेज समोरील रस्त्यालगत दिल्लीतून आलेल्या ट्रक चालक सरदारसिंग हिरासिंग यांनी ट्रक उभा केला. सकाळी ९ वाजता ट्रकची कॅबिन बंद करून ट्रक चालक हिरासिंग झोपी गेला. या दरम्यान ट्रक कॅबिनच्या खिडकीतून अज्ञात चोरट्याने मोबाईल चोरून मोबाईल मधील गुगल पे द्वारे ५५ हजार २०० रुपये यूपीआय ट्रांझेक्शनद्वारे काढून ट्रक चालक सरदारसिंग यांची फसवणूक केली. याप्रकरणी मध्यवर्ती पोलिसांना अज्ञात चोरट्या विरोधात गुन्ह दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.