शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

दरोडेखोरांना तिहेरी जन्मठेप; ठाणे न्यायालयाचा निर्णय, मोक्काअंतर्गतही झाली कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2023 08:02 IST

अशा प्रकारे तिहेरी जन्मठेपेची ठाणे न्यायालयाने प्रथमच अशी शिक्षा सुनावली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : दरोड्यासाठी एका बारमालकासह दोघांचा खून करणाऱ्या जांबूआ टोळीतील अमरू मांगो बबेरिया (२२), राजू मेढा (१९), उदयसिंग ऊर्फ छोटू बबेरिया (२१) आणि बापूसिंग सिंगाढे (२०, सर्व रा. जांबूआ जिल्हा, मध्य प्रदेश) यांना खून व दरोड्यात जन्मठेप तसेच माेक्कांतर्गत दाेनदा जन्मठेप व प्रत्येकी ११ लाखांच्या दंडाची शिक्षा ठाणे जिल्हा व सत्र तथा मोक्का न्यायाधीश अमित शेटये यांनी सुनावली. दंड न भरल्यास अतिरिक्त वर्षभराच्या शिक्षाही सुनावल्याची माहिती विशेष सरकारी वकील संगीता फड यांनी दिली. अशा प्रकारे तिहेरी जन्मठेपेची ठाणे न्यायालयाने प्रथमच अशी शिक्षा सुनावली आहे.

अवधनगर भागातील  बारमालक राकेश मोरे (३१) हे १७ फेब्रुवारी २०१० रोजी दुचाकीवरून घरी निघाले होते. त्याचवेळी दरोडेखोरांनी त्यांच्याकडील पैशांची बॅग खेचण्याचा प्रयत्न केला. त्यांनी प्रतिकार केल्याने उदयसिंगने राकेशवर गोळी झाडली. ही गोळी छातीतून आरपार जाऊन पाठीतून बाहेर गेली. यात त्याच्याकडील पैशांची बॅग रुद्राक्षाची सोन्याची माळ, पाकीट, मोबाइल व सोन्याच्या अंगठ्या असा एक लाख ६८ हजारांचा ऐवज चोरला. त्यानंतर आणखी एकावर  चोरीसाठी गोळीबार केला होता. या दोघांच्या खुनानंतर अमरू, राजू आणि बापूसिंग यांना २० ऑगस्ट २०१० रोजी, तर उदयसिंग याला १२ मे २०११ रोजी अटक झाली. यातील बसूला दहा वर्षांनंतर अटक झाली. त्याचा खटला प्रलंबित आहे. तर  मोहनसिंग वसुनिया  फरार आहे.

पोलिस ठाण्यातून पसार

पाचही आरोपीं पालघर पोलिस ठाण्याची कौले तोडून पळाले होते. त्यांच्यावर पालघर पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता.  हे खून करण्यापूर्वी ते मनोरच्या एका गंभीर गुन्ह्यात जामिनावर सुटले होते. अटकेनंतर  दागिने, मोबाइल, रोकड तसेच तीन गावठी कट्टे व १२ काडतुसे हस्तगत केली होती. चौघांना बोईसरमधून पकडले.  पोलिस अधिकारी एन. के. मुरादे यांनी या प्रकरणाचा तपास केला.

२ गंभीर गुन्हे

- अमरू आणि त्याच्या टोळीवर खून, दरोड्यासह २० ते २५ गंभीर गुन्हे दाखल आहेत.- एका गुन्ह्यात अमरू आणि उदयसिंग यांना चार वर्षांची शिक्षा झाली होती.

- यात ते जामिनावर सुटले होते. याच काळात त्यांनी दोन खुनांसह दरोड्याचा प्रकार केला होता. या खटल्यात २२ साक्षीदार तपासण्यात आले.

- विशेष सरकारी वकील संगीता फड यांनी आरोपींच्या शिक्षेसाठी जोरदार बाजू मांडली. पैरवी अधिकारी म्हणून पोलिस हवालदार शिर्के यांनी काम पाहिले.

 

टॅग्स :Life Imprisonmentजन्मठेपthaneठाणेCourtन्यायालय