हुंड्यासाठी दिला तिहेरी तलाक; गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 02:05 IST2020-02-16T02:05:56+5:302020-02-16T02:05:59+5:30

विवाहितेच्या माहेरची परिस्थिती बेताची असल्याने तिच्या लग्नाच्यावेळी हुंडा दिला नव्हता.

Triple divorce for dowry; Filed | हुंड्यासाठी दिला तिहेरी तलाक; गुन्हा दाखल

हुंड्यासाठी दिला तिहेरी तलाक; गुन्हा दाखल

भिवंडी : हुंड्यासाठी पत्नीला तिहेरी तलाक देणाऱ्या पतीसह सासरच्या मंडळींवर शुक्रवारी गुन्हा दाखल झाला आहे. शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पुढील तपासासाठी हे प्रकरण चितळसर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे.

विवाहितेच्या माहेरची परिस्थिती बेताची असल्याने तिच्या लग्नाच्यावेळी हुंडा दिला नव्हता. मात्र, यामुळे सासरच्या मंडळींकडून तिला सतत मानसिक त्रास सहन करावा लागत होता. विवाहितेकडून व तिच्या माहेरहून सासरच्या मंडळींनी ३० हजार घेतले होते. मात्र, तरीही पतीला दुचाकी व घरखरेदीसाठी सासरच्या मंडळींकडून वारंवार पैशांची मागणी केली जात होती. या मागणीस महिलेने विरोध केल्याने तिला पेटवून देण्याची धमकीही दिली होती.

या घटनेबाबत महिलेने आपल्या आईला सांगितले असता तिची आई तिला सासरहून माहेरी घेऊन निघाली असता पती शारीक अफजल शेख याने तिला तीनदा तलाक बोलून बेकायदा तलाक दिला. याप्रकरणी महिलेने शांतीनगर पोलिसात तलाकविरोधात पती, सासू सायरा अफजल शेख, दीर शमशेर अफजल शेख, जमशेर शेख, जाऊ यास्मिन कुमीन मलिक (सर्व रा. मानपाडा, ठाणे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

Web Title: Triple divorce for dowry; Filed

टॅग्स :thaneठाणे